ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ
रत्नागिरी

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 3:23 pm
Gramin Varta
41 Views
Share

बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका; झाडी तोडण्याची नागरिकांची मागणी

संगलट (खेड) : खेड तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या कोरेगाव-संगलट रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनधारकांना रस्ता दिसणेही कठीण झाले आहे. विशेषतः रस्त्यावरील वळणांवर समोरून येणारे वाहन नजरेस पडत नसल्याने लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची अवस्था पाहता ‘रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरेगाव-संगलट हा रस्ता दापोली, मंडणगड आणि गुहागर या तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. संगलट, फोफळवणे आदी परिसरातील लहान-मोठे विद्यार्थी रिक्षा, टेम्पो तसेच अन्य वाहनांमधून शिक्षणासाठी खेडकडे ये-जा करीत असतात. मात्र, दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे रस्त्याचा मोठा भाग झाकला गेला असून, वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे अवघड होत आहे.

त्यातच भर पावसाळ्यात या मार्गावर जांभ्या चिऱ्याच्या तसेच वाळूच्या गाड्यांची वाहतूक होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अनधिकृत चिऱ्याच्या खाणींमधून वाहतूक होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. मोठे डंपर या अरुंद आणि झाडीने व्यापलेल्या रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने लहान वाहने तसेच विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. समोरासमोर वाहने आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या रस्त्यावर दोन मोठी वळणे असून, खालून वर चढताना समोरचा रस्ता झाडीमुळे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे समोरून अचानक वाहन आल्यास दोन्ही वाहनचालकांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रकारही घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एखादा भीषण अपघात झाल्यानंतरच बांधकाम विभाग जागा होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावरील दुतर्फा वाढलेली झाडी तातडीने तोडून वाहनधारकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. झाडी तोडण्याची कारवाई तातडीने करण्यात आली नाही तर संबंधित बांधकाम खात्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Navigating the Cosmos to Uncover the Mysteries of the Universe

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

Gramin Varta
2 Min Read

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

उत्पादनात घट आणि आंबाघाट बंदचा दुहेरी फटका; गणेशोत्सवात नारळाने ओलांडली पन्नाशी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

2 Min Read
रत्नागिरी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

1 Min Read
रत्नागिरी

दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?