ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 9:35 am
Gramin Varta
16 Views
Share

रत्नागिरी : पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या क्रूझर वाहनाची तोडफोड करून ती पेटवून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) या संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेगाव (जि. सांगली) येथील अशोक नागाप्पा गोठेकर (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

फिर्यादी अशोक गोठेकर हे त्यांचे मित्र अशोक बागडे यांच्या मुलीचा आणि जावयाचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने राहुल काटकर यांच्या मालकीची क्रूझर गाडी (एमएच-१०-बीएन-७१५२) घेऊन रत्नागिरीत आले होते. नातेवाइकांची सायंकाळची बैठक निष्फळ ठरल्याने हा विषय शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचे ठरले होते. त्यानंतर गोठेकर हे आठवडा बाजार परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले असता, त्यांनी सदर वाहन लॉजच्या पार्किंगमध्ये उभे केले होते.

गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पार्किंगमधील गाडीला आग लागल्याचे समोर आले. अग्निशमन दलाने आग विझवेपर्यंत वाहनाचे प्रचंड नुकसान झाले होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संशयित आरोपी आकाश खेत्री हा वाहनाच्या काचा फोडून ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने गाडी पेटवून देताना उघडकीस आला. या पुराव्यांच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एथरची ७९,९९९ रुपयांना ‘कोणार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लाॅन्च

Gramin Varta
5 Min Read

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

Gramin Varta
2 Min Read

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

Gramin Varta
1 Min Read

हातखंबा तिठा-गाव मार्गावरील धोकादायक उतार ठरतोय अपघातांचा सापळा; गतिरोधकासह सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कर्णकर्कश फटाका सायलेंसर दुचाकींवर कारवाईचा बडगा; बेकायदा विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर, थेट जप्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

2 Min Read
रत्नागिरी

उत्पादनात घट आणि आंबाघाट बंदचा दुहेरी फटका; गणेशोत्सवात नारळाने ओलांडली पन्नाशी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

2 Min Read
रत्नागिरी

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

1 Min Read
रत्नागिरी

‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?