ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान
रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 6:40 pm
Gramin Varta
87 Views
Share

रत्नागिरी: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आणि वैद्यकीय संशोधनाला मोलाची मदत व्हावी, या सामाजिक भावनेतून नाटे येथील नामदेव दामोदर पाध्ये (वय ८५) यांच्या पार्थिवाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे देहदान करण्यात आले. शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महाविद्यालयात झालेले हे पहिले देहदान असून, महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचे हे २३ वे देहदान ठरले आहे.

नामदेव पाध्ये यांचे १९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने लोटलीकर हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत २० मार्च २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र भरून दिले होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा सन्मान करत देहदानाचा निर्णय घेतला. पाध्ये यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी तसेच वैद्यकीय संशोधनासाठी त्यांच्या पार्थिवाचा उपयोग होणार आहे.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते पाध्ये यांचे सुपुत्र महेश पाध्ये यांना सन्मानदर्शक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी स्नुषा शुभदा पाध्ये, कन्या अर्चना गोखले, सुषमा गगनग्रास, ज्योती नेने, जावई तसेच डॉ. महेंद्र पाध्ये, प्रभात पाध्ये, गोपीनाथ करंबेकर, श्रीकांत गोखले यांच्यासह कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर, नितीन घोसाळकर आणि वाहनचालक सागर नारकर व प्रणय पाटील यांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेत नामदेव पाध्ये यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली असून, त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या इच्छेचा आदर करत हा सामाजिक उपक्रम पूर्ण केला. पाध्ये कुटुंबीयांच्या या संवेदनशील आणि समाजोपयोगी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

Gramin Varta
2 Min Read

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

Gramin Varta
1 Min Read

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

1 Min Read
रत्नागिरी

‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग

2 Min Read
रत्नागिरी

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?