ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेकडून  सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेकडून  सोन्या-चांदीचे दागिने लंपास
दापोली

दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेकडून  सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 4:50 pm
Gramin Varta
113 Views
Share
Medium close up of male hand in black glove holding golden pearl jewelry while it illuminated with flashlight

दापोली  : घरात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलेनेच मालकाच्या घरातील सुमारे ९८ हजार २८२ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील जालगाव विद्यानगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात संशयित महिला मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा विकास सुर्वे (वय ४३ वर्षे, रा. गुरव चाळ, गजानन महाराज नगर, पेट्रोल पंपाजवळ, गिम्हवणे, ता. दापोली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

या संदर्भात विद्यानगर जालगाव, नर्सरी रोड येथील रहिवासी रवींद्र गंगाराम क्षीरसागर (वय ६२) यांनी दापोली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित उषा सुर्वे ही फिर्यादी क्षीरसागर यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करत होती. २१ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या पूर्वी तिने घरातील लोकांची नजर चुकवून आणि विश्वासाचा गैरफायदा घेत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने कपाटातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये विविध वजनाची चार चांदीची निरांजने, एक चांदीची वाटी, एक चांदीचा करंडा, सुमारे २ ग्रॅम वजनाचे लहान मुलाच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, सुमारे ०.३२० ग्रॅम वजनाची सोन्याची सटवी आणि ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९८ हजार २८२ रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे. घरात ठेवलेले दागिने जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर क्षीरसागर यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित उषा विकास सुर्वे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ अन्वये मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त २२ वर्षीय तरुणीचा दापोलीत उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; रत्नागिरीतील दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे होणार : राज्यमंत्री योगेश कदम

Gramin Varta
2 Min Read

खेडमध्ये १७ सार्वजनिक तर १ हजार ५३० घरगुती गणपतींचे शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन

Gramin Varta
2 Min Read

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून दापोलीत राजकीय वातावरण तापले; ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध

2 Min Read
दापोली

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

2 Min Read
दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read
दापोली

दापोली उपजिल्हा रुग्णालयात ‘लड्डू गोपाल योजने’अंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी; बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?