ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज
दापोली

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:20 am
Gramin Varta
220 Views
Share

नवी दिल्ली : इंटरनेट डेटाचा वापर न करणाऱ्या किंवा केवळ फोन कॉल आणि मेसेजपुरता मोबाईल वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) घेतला आहे. ट्रायने २१ सप्टेंबर रोजी ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन, २०२६’ जारी केले असून, अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांनी हा नवा नियम देशभरात लागू होणार आहे. या नव्या नियमावलीनुसार आता जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांसारख्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणारे स्वस्त व्हॉईस-एसएमएस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स मोठ्या प्रमाणावर बाजारात आणावे लागणार आहेत.

सध्या टेलिकॉम कंपन्यांच्या बहुतांश लोकप्रिय पॅकमध्ये कॉलिंग, एसएमएस आणि डेटा या तिन्ही सुविधा एकत्र दिल्या जात असल्याने इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांनाही डेटासाठी नाहक पैसे मोजावे लागत होते. डिसेंबर २०२४ मध्ये ट्रायने असे प्लॅन आणण्याचे निर्देश दिले होते; मात्र कंपन्यांनी केवळ ८०, ८४ अथवा ३३६ व ३६५ दिवसांचे महागडे आणि दीर्घ मुदतीचे प्लॅन उपलब्ध केले होते, तर कमी वैधतेचे पर्याय अत्यंत मर्यादित ठेवले होते. यामुळे ग्रामीण भागातील जनता, ज्येष्ठ नागरिक, कमी उत्पन्न असलेले ग्राहक आणि साधे फीचर फोन वापरणाऱ्यांवर नको असलेल्या डेटासाठी भुर्दंड सोसण्याची वेळ येत होती. कंपन्यांचा महसूल घटण्याचा युक्तिवाद फेटाळून लावत ट्रायने आता जितक्या वैधतेचे डेटा बंडल प्लॅन उपलब्ध आहेत, तितक्याच कालावधीचे डेटा नसलेले स्वतंत्र प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक केले आहे.

कंपन्यांना कोणतीही ठराविक किंमत निश्चित करून देण्यात आलेली नसली, तरी स्पेशल टॅरिफ व्हाउचरमधून डेटा सुविधा वगळल्यानंतर त्या प्रमाणात रिचार्जच्या किमतीत योग्य ती कपात करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय दर महिन्याला एकाच ठराविक तारखेला नूतनीकरण करता येईल असा किमान एक प्लॅन देणेही आवश्यक करण्यात आले आहे, ज्यामुळे २८ दिवसांच्या सायकलमुळे ग्राहकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. जे ग्राहक नियमित इंटरनेट वापरतात त्यांचे डेटा असलेले प्लॅन पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून, केवळ कॉलिंगची गरज असणाऱ्या किंवा वाय-फाय वापरणाऱ्या ग्राहकांना आता डेटा नसलेले स्वस्त पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

हवामान बदल आणि वाढत्या खर्चाने मच्छीमार संकटात; उत्पादनात वाढ होऊनही आर्थिक कोंडी कायम, ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

Gramin Varta
3 Min Read

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

2 Min Read
दापोली

हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर

1 Min Read
दापोली

भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून दापोलीत राजकीय वातावरण तापले; ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध

2 Min Read
दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?