ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दिवेआगार समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दिवेआगार समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
कोकण

दिवेआगार समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:02 am
Gramin Varta
257 Views
Share

रायगड: येथील दिवेआगरच्या समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सर्व विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका खासगी क्लासचे विद्यार्थी होते.

ते एकत्र सहलीला आले होते. या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी विनार्स ॲकॅडमी या क्लासचे विद्यार्थी होते. आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी इयत्ता अकरावी आणि बारावीचे होते. एकूण 42 विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यामध्ये 17 मुली आणि 25 मुलांचा समावेश होता.

आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. तसेच इतर विद्यार्थी आणि शिक्षक देखील याच आरोग्य केंद्रावर असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. सर्वांना शोधून समुद्रातून बाहेर काढण्यात आलं. यावेळी इतर विद्यार्थी, पोलीस आणि शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठही विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाला.

मृतांची नावे खालील प्रमाणे

1. यश किरण वानखेडे

2. ⁠सोहम तुकाराम भांडवलकर

3. ⁠तन्मय दत्तात्रय वाहिले

4. ⁠कौस्तुभ संदीप दौंड

5. ⁠कैवल्य वासनकर

6. ⁠राजवीर वहिले

7. ⁠प्रणव बनसोडे

8. ⁠सुमित अहिरे

दिवेआगारचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी माध्यमांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, आळंदीची एक पोलीस प्रशिक्षण अॅकॅडमी आहे. त्यातील काही विद्यार्थी येथे सहलीसाठी आले होते. ते पाण्यात पोहत असताना एक जण बुडाला, त्याला वाचवण्यासाठी गेले असता एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

दिवेआगर येथील ‘महाकाली वॉटर स्पोर्ट्स’चे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोधमोहीम राबवली. आपल्या जीवाची पर्वा न करता भाऊ साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत.

Total Visitors :

5435605
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

Gramin Varta
2 Min Read

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
2 Min Read

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
2 Min Read

नेपाळमध्ये ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; अख्खा डोंगर खचून नदीत कोसळला, २४ ठार, १४ बेपत्ता तर शेकडो घरे जमीनदोस्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

कोकण

विजयदुर्ग समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारी करणारी रत्नागिरीची नौका २० खलाशांसह जप्त

2 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

4 Min Read
कोकण

रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या; पत्नीला मेसेज पाठवून संपवले जीवन

1 Min Read
कोकण

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?