ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल
रत्नागिरी

जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल

Gramin Varta
Last updated: November 3, 2026 9:04 pm
Gramin Varta
475 Views
Share

जयगड/ वैभव पवार: जयगड परिसरातील जिंदाल कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्थानिकांच्या सुरक्षेसह विविध न्याय मागण्यांसाठी स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, मच्छीमार व कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण आता अधिक आक्रमक वळणावर पोहोचले आहे. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलनातील सिकंदर खाडे आणि आशिष गडदे या दोन प्रमुख उपोषणकर्त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने आंदोलनस्थळी मोठी खळबळ उडाली. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिका पथकाने तातडीने उपोषणस्थळी धाव घेऊन दोघांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आपल्या सहकाऱ्यांची तब्येत बिघडल्याची वार्ता पसरताच जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छीमार मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा होऊ लागले आहेत. सुरुवातीला मोजक्या संख्येने सुरू झालेल्या या आंदोलनाला आता परिसरातील नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत असून आंदोलकांची गर्दी झपाट्याने वाढत आहे. संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जोरदार घोषणाबाजीने दणाणून सोडला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक कामगार, मच्छीमार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांवर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे जनआंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गुहागर: परचुरीतील भैरी वाघजाई ३२ हजारांचे दोन ॲम्प्लिफायर चोरीला

Gramin Varta
1 Min Read

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

Gramin Varta
2 Min Read

सलग सुट्ट्यांनी दापोलीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा गजबजला; रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल, हर्णै बंदरात पर्यटकांसह खवय्यांची मासे खरेदीसाठी झुंबड

Gramin Varta
3 Min Read

भाजपच्या पक्षप्रवेशाचा धडाका; कोंडसर खुर्द शेडेकरवाडीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव आणि वसुंधरा वारीचे आयोजन

1 Min Read
रत्नागिरी

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; २६ नोव्हेंबरला संविधान दिनी कोकण रेल्वे रोखण्याचा इशारा

2 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग : रानपाट गोणबरेवाडीत कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत एसटी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; बस अडवून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?