ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग : रानपाट गोणबरेवाडीत कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग : रानपाट गोणबरेवाडीत कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद
रत्नागिरी

ब्रेकिंग : रानपाट गोणबरेवाडीत कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 11:42 am
Gramin Varta
2.3k Views
Share

वन विभागाकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त

रत्नागिरी: तालुक्यातील मौजे रानपाट गोणबरेवाडी येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने अत्यंत शिताफीने जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.

रानपाट गोणबरेवाडी येथील रहिवासी अनंत रामा गोनबरे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या जातीचा वन्यप्राणी अडकल्याची बाब समोर आली. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटलांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्ष पाहणी केली असता बिबट्या खुराड्यामध्ये शांत बसलेला दिसून आला.

बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथकाने तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. खुराड्याच्या दरवाजाला लोखंडी ग्रील व प्लायवूड लावून दरवाजा अर्धा बंद करण्यात आला आणि समोर लोखंडी पिंजरा लावण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या या नियोजनामुळे बिबट्या कोणत्याही इजा न होता थेट पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जेरबंद केलेल्या बिबट्याची जाकादेवी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले.

ही संपूर्ण यशस्वी कारवाई रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेदरम्यान परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, कांदळवन कक्षाचे किरण पाचारणे व धनंजय यादव, तसेच महेश धोत्रे आणि दीपक कदम घटनास्थळी उपस्थित होते. वन विभागाने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन; बुद्ध-धम्म स्वरआराधनेतून महामानवांच्या विचारांना मिळणार उजाळा

Gramin Varta
2 Min Read

राजापूर: प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात डॉक्टरेट

Gramin Varta
2 Min Read

मानसकोंड ग्रामपंचायतीत लोकसहभागातून श्रमदान; वनराई बंधारा पूर्ण

Gramin Varta
1 Min Read

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

बुद्धविहार हे व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र; करबुडे येथे वर्षावास प्रवचनमाला उत्साहात संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

Embracing Change Key Milestones in the Current Evolution Era

रत्नागिरी

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

1 Min Read
रत्नागिरी

उत्पादनात घट आणि आंबाघाट बंदचा दुहेरी फटका; गणेशोत्सवात नारळाने ओलांडली पन्नाशी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?