ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात डॉक्टरेट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात डॉक्टरेट
राजापूर

राजापूर: प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात डॉक्टरेट

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 9:33 am
Gramin Varta
55 Views
Share

कादंबरीकार मंजू कपूर यांच्या साहित्यावरील संशोधनाला मान्यता

राजापूर: येथील रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे कला, न्यू कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमधील इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका मंजुषा दादाबा सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंग्रजी विषयातील सर्वोच्च अशी ‘पीएच.डी.’ (विद्यावाचस्पती) पदवी नुकतीच प्रदान केली आहे. सासवड (पुणे) येथील वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून त्यांनी डॉ. गणेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले असून, या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे राजापूर तालुक्यासह संपूर्ण शैक्षणिक वर्तुळातून विशेष कौतुक केले जात आहे.

प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या प्रबंधात भारतीय इंग्रजी साहित्यातील प्रख्यात लेखिका मंजू कपूर यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील स्त्री पात्रांच्या विविध पैलूंचा सखोल आणि समीक्षात्मक वेध घेण्यात आला आहे. “A Study of Silence and Resilience in the Select Novels of Manju Kapur” या विषयांतर्गत त्यांनी भारतीय मध्यमवर्गीय स्त्रीजीवनातील मानसिक ताणतणाव, पारंपरिक कौटुंबिक चौकट आणि पितृसत्ताक सामाजिक बंधनांच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांवर लादले गेलेले मौन ही त्यांची कमकुवतता नसून तो एक अबोल प्रतिकार असतो, हे प्रभावीपणे मांडले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्त्रिया आत्मभान, शिक्षण, जिद्द आणि मानसिक कणखरतेच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कसे निर्माण करतात, याचे दिशादर्शक विश्लेषण या संशोधनात करण्यात आले असून आधुनिक स्त्रीवादी साहित्याच्या दृष्टीने या अभ्यासाची प्रशंसा होत आहे. अध्यापनातील प्रदीर्घ अनुभवासोबत सातत्याने उच्च दर्जाचे संशोधन आणि नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणाऱ्या प्रा. सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. गणेश सोनवणे, संशोधन केंद्राचे समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. संजय झगडे, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाच्या चेअरमन श्रीमती संगीताताई पाटील, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख विक्रांत पाटील, प्राचार्य डॉ. राजाराम राठोड तसेच संशोधन समितीचे प्रमुख हेमंतकुमार अकोलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना मोठा दणका; वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ तस्कर गजाआड

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील जोडरस्ते खड्ड्यात; कायमस्वरूपी डांबरीकरणासह समस्या सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

2 Min Read
राजापूर

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

2 Min Read
राजापूर

पाचल शाळेच्या परिसरातील बिबट्यांच्या वावराबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने वृत्त प्रसारित करताच वनविभाग ॲक्शन मोडवर

1 Min Read
राजापूर

दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर ऐतिहासिक झेप; क्रीडा क्षेत्रात गाठले यशाचे नवे शिखर

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?