ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर ऐतिहासिक झेप; क्रीडा क्षेत्रात गाठले यशाचे नवे शिखर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर ऐतिहासिक झेप; क्रीडा क्षेत्रात गाठले यशाचे नवे शिखर
राजापूर

दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर ऐतिहासिक झेप; क्रीडा क्षेत्रात गाठले यशाचे नवे शिखर

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 4:31 pm
Gramin Varta
36 Views
Share

राजापूर (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या ओझर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझर नं. १ ने क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे. गावात मोजक्या नागरी सुविधा उपलब्ध असतानाही अफाट जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर या शाळेने क्रीडाविश्वात आपली स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण केली आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकास घडवून आणण्याचा एक आदर्श पॅटर्न या शाळेने यशस्वीरीत्या राबवून दाखवला आहे.

गतवर्षी या शाळेतील १० ते ११ विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स, योगा आणि रग्बी या क्रीडा प्रकारांमध्ये थेट राज्यस्तरीय स्पर्धा गाजवली होती. तीच यशाची परंपरा अधिक भक्कमपणे पुढे नेत यंदाही विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचा दर्जा उंचावत विभाग व राज्यस्तरावर जोरदार झेप घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय शालेय स्पर्धांसह विविध अधिकृत क्रीडा संघटनांच्या स्पर्धांमध्ये ही शाळा सातत्याने अग्रभागी राहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये एकाच वेळी दमदार कामगिरी करणारी जिल्हा परिषदेची एकमेव आघाडीची शाळा म्हणून आज क्रीडा वर्तुळात ओझर शाळेचा गौरव केला जात आहे.

या दैदिप्यमान यशात दुर्वा मंगेश गुरव, पल्लवी पांडुरंग मालपेकर, श्रुती नरेश पळसमकर, अनन्या विवेक रेगे, दुर्वा सतीश रेगे, वैदही योगेश नवलू, काव्या उमेश रांबाडे, हाजीरा रिजवान नेवरेकर, आरोही संजय नवलू, आरोही नितीन भेरे, रिया प्रकाश नवलू, उर्वी अनंत गोसावी, साई राजेश गुरव, सार्थक जयेंद्र मालपेकर, आयमान असिफ गडकरी, मोहम्मदरुमान रशीद गडकरी, आजम रिजवान नेवरेकर, आर्य नितीन भेरे, हर्षल अनंत गोसावी, विघ्नेश बापू पांचाळ, पियुष दिलीप मालपेकर व गौरेश नरेंद्र राणे या गुणवंत खेळाडूंनी योगा, रग्बी आणि ॲथलेटिक्स प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्य पणाला लावून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.

विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामागे मुख्य प्रशिक्षक युवराज मोरे व सहायक प्रशिक्षक शैलेंद्र बंदसोडे यांचे मोलाचे क्रीडा मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, शिक्षक तथा कबड्डीचे राष्ट्रीय पंच दत्तात्रय गायकवाड, शिक्षक सतीश पाटील, शिक्षिका किशोरी पाटील, संदीप चव्हाण, माजी शिक्षक संजय चौगुले आणि राजेंद्र इंगळे यांचे अखंड परिश्रम फलदायी ठरले आहेत. या सर्व यशस्वी खेळाडू व शिक्षकांच्या पाठीशी सरपंच विकास रेगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मानसी गुरव, ग्रामपंचायत सदस्य जहीरभाई टोले, उपाध्यक्ष निलेश कुर्ले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ खंबीरपणे उभे असून, जिल्हा परिषद शाळेने राज्यस्तरावर मारलेल्या या उत्तुंग झेपेबद्दल संपूर्ण तालुक्यातून या चिमुकल्या खेळाडूंचे मनःपूर्वक कौतुक केले जात आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुर : धोपेश्वर गुरववाडी येथे किरकोळ वादातून महिलेवर काठीने हल्ला

Gramin Varta
1 Min Read

हंगामापूर्वीच कोकणात सागरी कासवांच्या विणीला सुरुवात; गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले पहिले घरटे

Gramin Varta
2 Min Read

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

राजापूर: नाणार खाडी दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तीन चिमुरड्यांचा दफनविधी, चौथ्या मुलीचा शोध सुरूच

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर : कोंडये तर्फे सौंदळ येथे मोकाट सोडलेल्या गायीने पिकलेली भातशेती तुडवली; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read
राजापूर

रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीत अव्वल ठरलेल्या नागेश बनेंच्या शेतीवर करपा रोगाचा घाला; राजापूर तालुक्यात बळीराजा दुहेरी संकटात

2 Min Read
राजापूर

व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून राजापूर-रत्नागिरीत वाद पेटला; बदनामी आणि मारहाणीप्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल

3 Min Read
राजापूर

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?