ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील जोडरस्ते खड्ड्यात; कायमस्वरूपी डांबरीकरणासह समस्या सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील जोडरस्ते खड्ड्यात; कायमस्वरूपी डांबरीकरणासह समस्या सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी
संगमेश्वर

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील जोडरस्ते खड्ड्यात; कायमस्वरूपी डांबरीकरणासह समस्या सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 9:13 am
Gramin Varta
29 Views
Share

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात सुरू असताना महामार्गाला संगमेश्वर शहर आणि विविध गावांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विशेषतः माभळे परिसरातील जोडरस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गाच्या कामासाठी माती, खडी आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर होणारी अवजड वाहतूक तसेच पाऊस यामुळे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनली आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने काही ठिकाणी केवळ खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली खरी; मात्र अवजड वाहतुकीमुळे हे रस्ते पुन्हा उखडत असल्याने अशा तकलादू उपायांऐवजी कायमस्वरूपी डांबरीकरण नेमके कधी होणार, असा थेट सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रस्त्यांच्या समस्येसोबतच महामार्गाच्या कामाचा मोठा फटका स्थानिक शेतकरी आणि सार्वजनिक सुविधांना बसला आहे. माभळे परिसरातील शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणारे मार्ग बंद होणे, पाण्याचा निचरा न होणे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे मोठे नुकसान होत असून या नुकसानाची पाहणी करून योग्य ती भरपाई आणि आवश्यक सुविधा देण्याची मागणी जोर धरत आहे. याशिवाय परिसरातील स्मशानभूमी तसेच गणेश विसर्जन घाटाचीही महामार्गाच्या कामामुळे दुरवस्था झाली असून वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ खडी टाकण्याचे सोपस्कार थांबवून जोडरस्ते, स्मशानभूमी, विसर्जन घाट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसेच प्रत्येक काम सुरू करण्याचे आणि पूर्ण करण्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी पुढे आली आहे. वारंवार इशारा देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने व कंपनीने या सर्व समस्यांची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माभळे परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

Total Visitors :

5468453
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख-बामणोली मार्गावर मारळजवळ पुन्हा खडीचा डंपर उलटला; बेदरकार वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनातून एक दिवसाची कपात

Gramin Varta
3 Min Read

पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न; १४ गावांचा २५ वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

पुर्ये तर्फे देवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

2 Min Read
संगमेश्वर

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

1 Min Read
संगमेश्वर

देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थ आक्रमक; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर साडवलीच्या डॉ. नेहा देवकर; देशातील आघाडीच्या विश्वासार्ह त्वचारोगतज्ज्ञांमध्ये गौरव

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?