ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बुद्धविहार हे व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र; करबुडे येथे वर्षावास प्रवचनमाला उत्साहात संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बुद्धविहार हे व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र; करबुडे येथे वर्षावास प्रवचनमाला उत्साहात संपन्न
रत्नागिरी

बुद्धविहार हे व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र; करबुडे येथे वर्षावास प्रवचनमाला उत्साहात संपन्न

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 3:29 pm
Gramin Varta
70 Views
Share

रत्नागिरी : बुद्धविहार हे केवळ धार्मिक विधींचे ठिकाण नसून मानवाच्या सर्वांगीण मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाला योग्य दिशा देणारे संस्कार केंद्र आहे, असे प्रतिपादन नामवंत पत्रकार तथा बौद्धाचार्य वैभव पवार यांनी केले. कपिलवस्तूनगर, करबुडे येथील संबोधी बुद्धविहारात बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३८, तालुका शाखा बौद्धजन पंचायत समिती आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास प्रवचनमालेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. करबुडे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संतोष कृष्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रबोधनात्मक कार्यक्रम रविवारी अत्यंत धम्ममय आणि उत्साही वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, स्थानिक अध्यक्ष संतोष जाधव, महिला मंडळ अध्यक्षा रोशनी जाधव यांच्यासह मुंबई मंडळाच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी पाली भाषा डिप्लोमा उत्तीर्ण केल्याबद्दल विजय जाधव व अनामिका जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना अनामिका जाधव यांनी पाली भाषेचे मूळ महत्त्व अधोरेखित करून तिचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केले.

मुख्य प्रवचनात बौद्धाचार्य वैभव पवार यांनी भगवान बुद्धांचा कार्यकारणभाव सिद्धांत अत्यंत सोप्या भाषेत मांडला. बुद्धविहारांमधील नियमित वंदना आणि धम्मचिंतन व्यक्तीच्या मानसिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीने समाजाला आत्मभान आणि नवी दिशा दिली असल्याचे स्पष्ट केले. यावेळी कपिलवस्तू बौद्धजन कमिटी, मुंबईचे अध्यक्ष नथुराम जाधव यांनी बुद्धविहारांमध्ये नियमित पाली भाषेचा अभ्यास सुरू करण्याचे आवाहन केले, तर तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार गुरुजी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना मुंबई कमिटीचे सचिव सिद्धार्थ जाधव यांनी हत्ती आणि अंध व्यक्तींच्या रूपकाचा दाखला देत धम्मकार्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. या धम्मप्रबोधन सोहळ्यास संस्कार कमिटी अध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, मुंबई कमिटीचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या आणि परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बौद्धाचार्य विश्वजीत जाधव आणि रविकांत पवार गुरुजी यांनी सादर केलेल्या सरणत्तय गाथेने या प्रेरणादायी प्रवचनमालेची यशस्वी सांगता झाली.

Total Visitors :

5468474
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

परतीचा पाऊसही ठरणार तोकडा; धरणांतील साठा आणि करपलेल्या खरिपाला दिलासा मिळणे कठीण, राज्यात दुष्काळाचे सावट गडद

Gramin Varta
3 Min Read

पुण्यातील एमपीएससी आंदोलनाप्रकरणी १५ जणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर शहराचा वीजपुरवठा खंडित; जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहिनीचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

शिष्यवृत्तीचा निधी रखडल्याने महाविद्यालये आर्थिक संकटात; रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचा आंदोलनाचा इशारा

2 Min Read
रत्नागिरी

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; रत्नागिरी विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

3 Min Read
रत्नागिरी

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीची धूपप्रतिबंधक भिंत कोसळली

2 Min Read
रत्नागिरी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?