ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन; बुद्ध-धम्म स्वरआराधनेतून महामानवांच्या विचारांना मिळणार उजाळा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन; बुद्ध-धम्म स्वरआराधनेतून महामानवांच्या विचारांना मिळणार उजाळा
रत्नागिरी

रत्नागिरीत अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन; बुद्ध-धम्म स्वरआराधनेतून महामानवांच्या विचारांना मिळणार उजाळा

Gramin Varta
Last updated: October 15, 2026 2:58 pm
Gramin Varta
68 Views
Share

रत्नागिरी : अशोक विजयादशमीचे औचित्य साधून तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा धम्मविजय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी रत्नागिरीत ‘मंगल धम्म प्रभात – बुद्ध-धम्म स्वरआराधना’ या विशेष सांगीतिक व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४५ वाजता विपश्यना ध्यान धारणा केंद्र, गयाळवाडी, खेडशी येथे संपन्न होणार आहे.

पहाटेच्या मंगल व शांत वातावरणात बुद्ध-धम्मावरील सुरेल व प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून तथागत बुद्धांची अथांग करुणा आणि प्रज्ञा, सम्राट अशोकांचा हिंसेकडून अहिंसेकडे आणि युद्धाकडून धम्माकडे झालेला वैचारिक प्रवास, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीचा सामाजिक आशय उलगडण्याचा संकल्प या स्वरआराधनेतून करण्यात आला आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक दिलीप मोहिते, अमरदीप कदम आणि गायिका सिद्धी कासारे यांच्या सुमधुर आवाजात धम्मगीते सादर होणार असून संगीत संयोजन स्वतः दिलीप मोहिते सांभाळणार आहेत. त्यांना तबल्यावर गौरव पाटकर, सिंथेसायझरवर ओंकार आंबेकर तर तालवाद्यावर नागसेन कांबळे साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन व प्रभावी निवेदन सुशील जाधव करणार असून, या सोहळ्यास कवी, लेखक तथा नाट्य-चित्रपट दिग्दर्शक उदय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संतोष कासारे (मंडणगड) तसेच धम्मदीप मंडळ, गयाळवाडी (रत्नागिरी) यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम साकारला जात आहे. अशोक विजयादशमीचा दिवस मानवी जीवनात विवेक, अहिंसा, करुणा आणि बंधुभाव दृढ करणारा ठरावा या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या संगीत आणि वैचारिक प्रबोधनाच्या पहाट सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5469277
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भारताचा न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय, कोहलीची अर्धशतकी खेळी

Gramin Varta
3 Min Read

हातखंबा-रत्नागिरी महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची पादचाऱ्याला धडक; वृद्ध गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर आंबवपोंक्षे शाळेच्या चिमुकल्यांचा ‘अनुभव हाच गुरु’ मधून प्रभावी कलाविष्कार

Gramin Varta
2 Min Read

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल; डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरातील तुटलेला कठडा पूर्ववत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

प्रशासनाचा ‘क्रीज’ सोडून जिल्हाधिकारी मनुज जिंदल ‘पीच’ वर; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बाॕलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: वाढत्या डिजेलच्या दरामुळे मत्स्य व्यवसाय संकटात

2 Min Read
रत्नागिरी

वाटद खंडाळा येथे डॉ. मयुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

2 Min Read
रत्नागिरी

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?