रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. काही भक्तांनी दीड दिवस, तर काहींनी पाच, सात, नऊ आणि तब्बल २१ दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे. दीड दिवसांच्या गणरायाचे आज, मंगळवारी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवामुळे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच खासगी आस्थापनांना सुटी असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणरायाच्या आगमनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली.
सायंकाळच्या सुमारास बाजारात पूजेसाठी लागणाऱ्या भाज्या, तांदूळ, पिठे, फळभाज्या तसेच नैवेद्यासाठी केळीची पाने, हळदीची पाने आणि अळूची पाने खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.
दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनामुळे आज विविध ठिकाणी भक्तिमय वातावरण राहणार आहे. गणरायाला निरोप देताना पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्याचीही तयारी भक्तांकडून करण्यात आली आहे.
दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप
Leave a Comment





