रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील इब्जी कुटुंबाने शैक्षणिक क्षेत्रातील आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरीफहसन इब्जी यांच्या कन्या कु. सलमा इब्जी हिने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रुग्णसेवेतील प्रत्यक्ष अनुभव, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर तिने मिळवलेल्या या यशाबद्दल मजगाव परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे, इब्जी कुटुंबातील यापूर्वीच तीन सदस्यांनी डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. त्यानंतर सलमा हिने नर्सिंग क्षेत्रात यश मिळवल्याने कुटुंबाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सलमा इब्जी हिच्या या यशाबद्दल मजगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक फय्याज मुकादम, समाजसेवक एजाज इब्जी, मुजफ्फर मुकादम, जहीर मुकादम, जमातुल मुस्लिमीन मजगावचे माजी उपाध्यक्ष मकबूल मुकादम, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष ताजुद्दीन खलफे यांच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या यशाचे श्रेय सलमा हिने आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक असलेले डॉक्टर भाऊ, बहीण, वहिनी तसेच सेवानिवृत्त शिक्षिका आत्या फरीदा हकीम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला आणि सहकार्याला दिले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आपल्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा मिळाल्याचे तिने सांगितले.
इब्जी कुटुंबातील तीन डॉक्टरांनंतर सलमाने नर्सिंग क्षेत्रात मिळवलेले यश हे मजगावच्या शैक्षणिक वाटचालीसाठीही अभिमानाची बाब ठरली असून, तिच्या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे.
मजगावच्या इब्जी कुटुंबाचा शैक्षणिक वारसा कायम; तीन डॉक्टरांनंतर सलमा इब्जीचे नर्सिंग क्षेत्रात यश
Leave a Comment





