ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर रेल्वे स्टेशन मध्ये चार साप्ताहिक एक्स्प्रेस थांब्यांसाठी संगमेश्वरकरांची जन पत्र मोहीम!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर रेल्वे स्टेशन मध्ये चार साप्ताहिक एक्स्प्रेस थांब्यांसाठी संगमेश्वरकरांची जन पत्र मोहीम!
संगमेश्वर

संगमेश्वर रेल्वे स्टेशन मध्ये चार साप्ताहिक एक्स्प्रेस थांब्यांसाठी संगमेश्वरकरांची जन पत्र मोहीम!

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 4:01 pm
Gramin Varta
57 Views
Share

कोकण रेल्वेच्या CMD यांना नागरिकांनी वैयक्तिक पत्रे पाठविण्याचे आवाहन; जनतेच्या एकजुटीतून थांब्यांसाठी प्रयत्न

संगमेश्वर : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात चार साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी आता संगमेश्वरच्या जनतेच्या वतीने पत्रमोहीम राबविण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांना नागरिकांनी स्वतःच्या वतीने पत्रे पाठवून या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील सुमारे १९६ गावांतील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात चार साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने या मागणीसाठी आता जनतेने मोठ्या संख्येने पुढाकार घेण्याची गरज आहे.

या चार एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, ही मागणी :
१. १०११५/१०११६ – वांद्रे टर्मिनस–मडगाव एक्स्प्रेस
२. १६३११/१६३१२ – श्री गंगानगर–तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस
३. १२९७७/१२९७८ – अजमेर–एर्नाकुलम मारुसागर एक्स्प्रेस
४. ०२१९७/०२१९८ – जबलपूर–कोईम्बतूर एक्स्प्रेस
या चारही गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळाल्यास तालुक्यातील नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नियमित रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे ही मागणी केवळ काही व्यक्तींची नसून संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीशी संबंधित आहे.

प्रत्येक घरातून पत्र, प्रत्येक प्रवाशाचा सहभाग!
या पत्रमोहीमेत घरातील प्रत्येक रेल्वे प्रवाशाने स्वतंत्र पत्र पाठवावे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गावातील नागरिकांनाही सहभागी करून घेऊन जास्तीत जास्त पत्रे कोकण रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.


“संगमेश्वरच्या चार एक्स्प्रेस थांब्यांसाठी आता जनतेनेच एकजुटीने पुढे यावे. प्रत्येक नागरिकाचे पत्र ही आपल्या मागणीला मिळणारी ताकद आहे. ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा ग्रुपची लढाई नसून संपूर्ण संगमेश्वरच्या जनतेच्या हक्काची लढाई आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून या पत्रमोहीमेत सहभागी व्हावे,” अशी भावना नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

खाद्यपदार्थांमधून कोट्यवधींच्या सोन्याची तस्करी उधळली; मुंबई विमानतळावर ‘डीआरआय’चा मोठा दणका

Gramin Varta
2 Min Read

मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत;गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी

Gramin Varta
1 Min Read

पाटपन्हाळे येथे पोलिसांकडून सायबर सुरक्षेचे धडे; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे गुहागर पोलिसांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read
संगमेश्वर

कोंडगाव ग्रामपंचायतीच्या ‘हर घर जल’ ठरावाला अद्याप सूचक-अनुमोदक मिळेनात; भ्रष्टाचाराच्या संशयावरून माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश सावंत एसीबीकडे जाणार

2 Min Read
संगमेश्वर

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर डंपर पलटी; निवेखुर्द येथील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत फणसवणे नं. १ शाळेची अजिंक्य कामगिरी; रोमांचक लढतीत देवरुखला नमवून पटकावले विजेतेपद

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?