ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
महाराष्ट्र

राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 8:17 am
Gramin Varta
42 Views
Share

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.

येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, विशेषतः अंतर्गत भागातही पावसाचा जोर वाढू शकतो.

येत्या १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी नाशिकमध्येही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या या पावसामुळे दीर्घकाळ कोरड्या हवामानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात जवळपास ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला होता. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. जमिनीतील ओलावा वाढण्यास या पावसाची मदत होणार असून, पिकांना कितपत फायदा होईल हे आगामी काळातील पावसावर अवलंबून राहणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातही दीड महिन्याहून अधिक काळानंतर मध्यरात्री हलक्या सरी बरसल्या. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने जमिनीची तहान अद्याप भागलेली नसली, तरी पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लातूर शहर आणि परिसरातही दीड महिन्यांच्या मोठ्या खंडानंतर रात्री दीड वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस झाला. जोरदार वारे आणि पावसामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

हिंगोली जिल्ह्यातही रात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला या पावसाचा फायदा होण्याची शक्यता असून, दीड महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

Gramin Varta
1 Min Read

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

Gramin Varta
2 Min Read

अभिषेक शर्मा टी-२० सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

Gramin Varta
2 Min Read

दापोलीच्या मातीतल्या शुभम लोंढेची राष्ट्रीय स्तरावर धडक; पॉवरलिफ्टिंगमध्ये दुहेरी रौप्यपदक पटकावत उंचावला महाराष्ट्राचा झेंडा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

3 Min Read
महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्तनदा माता व बाळांच्या सुरक्षिततेसाठी उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?