ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘नमो’चे चार हजार थकवून पाच हजारांच्या मदतीचा दिखावा; राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकरी संघटनांचा घणाघात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘नमो’चे चार हजार थकवून पाच हजारांच्या मदतीचा दिखावा; राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकरी संघटनांचा घणाघात
महाराष्ट्र

‘नमो’चे चार हजार थकवून पाच हजारांच्या मदतीचा दिखावा; राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकरी संघटनांचा घणाघात

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 10:42 am
Gramin Varta
71 Views
Share

मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हक्काचे चार हजार रुपये थकवून ठेवायचे आणि दुसरीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर पाच हजार रुपयांचा अग्रीम जाहीर करून मदतीचा निव्वळ देखावा उभा करायचा, हा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत निव्वळ धूळफेक असून बळीराजाची घोर फसवणूक असल्याचा थेट आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. एका हाताने हक्काची मदत अडवून ठेवायची आणि दुसऱ्या हाताने उपकाराचा आव आणत घोषणांचा पाऊस पाडायचा, असा अजब कारभार सध्या सुरू असल्याचे सांगत शेतकरी संघटनांनी शासनाच्या या दुटप्पी भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेच्या धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ जून २०२३ रोजी राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मार्च २०२५ आणि जून २०२६ या दोन्ही कालावधीतील हप्ते शासनाने अद्याप वितरित केलेले नसून, सुमारे ३,७०० कोटी रुपयांचा हा हक्काचा निधी वर्ग करण्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे पाठवलेला प्रस्ताव लालफितीत पडून आहे. त्यावर वित्त विभागाने अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. अशा बिकट स्थितीत रब्बी हंगामाचा हप्ताही देय असताना, जुनी देणी न देता केवळ पाच हजारांची नवी घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा सरकारचा प्रयत्न अत्यंत संतापजनक असल्याची टीका किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे. सरकारने आधी हक्काचे चार हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत आणि त्यानंतरच मदतीचे श्रेय घ्यावे, अशी आक्रमक मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

दुष्काळाची झळ आणि प्रचंड महागाईच्या कात्रीत सापडलेल्या बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असताना, थकीत रक्कम दाबून ठेवून केवळ पाच हजारांची तोकडी मदत शेतकऱ्यांचे अश्रू कसे पुसणार, असा परखड सवाल उपस्थित करत विरोधकांनीही शासनाला धारेवर धरले आहे. थकीत हप्त्यांचे हजारो कोटी रुपये त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी चालढकल करण्याचे असे धोरण यापूर्वी राज्यात कधीही पाहायला मिळाले नव्हते, असा घणाघाती आरोप करत या फसव्या घोषणाबाजी विरोधात शेतकरी वर्गातून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :

5468546
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गावडेआंबेरे येथे घराच्या अंगणात चालणाऱ्या बेकायदा हातभट्टी दारू विक्रीवर पूर्णगड पोलिसांचा छापा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : राधाकृष्ण येथे खिडकीचे लॉक तोडून सव्वादोन लाखांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात

Gramin Varta
1 Min Read

कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मूल्यवर्धन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनातून एक दिवसाची कपात

3 Min Read
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

2 Min Read
महाराष्ट्र

केवायसी रखडलेल्या राज्यातील ८१ लाख लाडक्या बहिणींना दिवाळीची मोठी भेट; बंद पोर्टल पूर्ववत सुरू करून १५०० रुपयांचा हप्ता देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

2 Min Read
महाराष्ट्र

‘शेतकऱ्यांनी काळजी करू नये; महाराष्ट्राला मदतीचा हात देणार’- पंतप्रधान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?