ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘शेतकऱ्यांनी काळजी करू नये; महाराष्ट्राला मदतीचा हात देणार’- पंतप्रधान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘शेतकऱ्यांनी काळजी करू नये; महाराष्ट्राला मदतीचा हात देणार’- पंतप्रधान
महाराष्ट्र

‘शेतकऱ्यांनी काळजी करू नये; महाराष्ट्राला मदतीचा हात देणार’- पंतप्रधान

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 7:47 am
Gramin Varta
120 Views
Share

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची दिली ग्वाही

पुणे: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची आपल्याला पूर्ण जाणीव असून, संकटाच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.

दुष्काळातून सावरण्यासाठी महाराष्ट्राला आगामी काळात केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ठाम ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. पुण्यातील हिंजवाडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव शर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मराठीतून दिवाळीच्या शुभेच्छा देत भाषणाची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मला माहिती आहे. राज्य सरकारने आगाऊ मदत दिली आहे. मी ‘पीएम किसान’चा निधी दिला आहे. शेतकऱ्यांनो, काळजी करू नका,’ अशा शब्दांत त्यांनी बळीराजाला आश्वस्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जलसंधारणाची अनेक कामे झाली आहेत. मात्र, बदलते हवामान आणि पर्यावरणाचे संकट हे मोठे आव्हान असून, त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकाने संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. ‘सणासुदीचा काळ आहे. आपल्या भाऊबंदांच्या अडचणी आपण समजून घ्यायला हव्यात. दिवाळी साजरी करताना दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या आपल्या बांधवांचाही विचार केला पाहिजे,’ असे मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा; मदतीच्या अंमलबजावणीकडे लक्ष

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. राज्य सरकारने केलेली आगाऊ मदत आणि पीएम किसान सन्मान निधीचा उल्लेख करत त्यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. आगामी काळात केंद्राकडून कोणत्या स्वरूपात आणि किती मदत उपलब्ध होणार, याबाबत शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त

Gramin Varta
1 Min Read

दुष्काळग्रस्त बळीराजाला दिवाळीची भेट; ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजारांची मदत जमा

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

2 Min Read
महाराष्ट्र

देशातील मान्सूनच्या १५५ वर्षांच्या इतिहासात १११ वर्षे ‘सामान्य’ पर्जन्यमान; २७ वर्षांत दुष्काळाचे सावट

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार – संजीव जयस्वाल

3 Min Read
महाराष्ट्र

काकाच्या तिजोरीवर डल्ला मारून दारात आणली ‘थार’, काकाला पूजेला बोलावून फोडला नारळ; १९ वर्षांच्या पुतण्याचा महाभयंकर कांड

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?