ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 8:33 am
Gramin Varta
47 Views
Share

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ₹३९१.०२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित झाला आहे.

एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला.

एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेला महामंडळाच्या आर्थिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी करताना महामंडळावर मोठा आर्थिक भार येतो. या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वेळेत उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होते.

शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर आर्थिक अडचणींचे सावट पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.

“एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सेवेला अहोरात्र कार्यरत ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,” अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली-खेड मार्गावर ९ महाकाय टाक्यांची जीवघेणी वाहतूक; नियमांची पायमल्ली करणाऱ्या टेम्पोवर कारवाईची मागणी

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत कुरचुंब येथे वनराई बंधारा साकारला!

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

Gramin Varta
2 Min Read

भाजपच्या पक्षप्रवेशाचा धडाका; कोंडसर खुर्द शेडेकरवाडीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढणार; ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पारा ३९ अंशांवर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज

2 Min Read
महाराष्ट्र

रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित

2 Min Read
महाराष्ट्र

ब्रेकिंग: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?