ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित
महाराष्ट्र

रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:11 am
Gramin Varta
42 Views
Share

मुंबई: आतापर्यंत रोमँटिक आणि ग्लॅमरस भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता एका दमदार ॲक्शन अवतारात दिसणार आहे. तिच्या आगामी ‘मैसा’ या चित्रपटाचा थरारक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात रश्मिकाचा रौद्र आणि आक्रमक अंदाज पाहायला मिळत आहे.

हातात कोयता, अंगावर काटा आणणारे प्रसंग आणि पाण्याखालील ॲक्शन दृश्यांमुळे ‘मैसा’च्या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.

‘मैसा’ या चित्रपटातून रश्मिका पहिल्यांदाच दमदार ॲक्शन भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर आणि याआधी प्रदर्शित करण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे तिच्या व्यक्तिरेखेबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता टीझरमध्ये तिचे वेगळे रूप समोर आले आहे. टीझरची सुरुवात रश्मिकाच्या आवाजाने होते. ती म्हणते, “मी थकलेय, मी थांबलेय, मी हरलेय.” त्यानंतर टीझर थेट ॲक्शनच्या दिशेने जातो. कठीण परिस्थितीत अडकलेली तिची व्यक्तिरेखा आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष करताना दिसते.

रवींद्र पुल्ले यांनी ‘मैसा’च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा पॅन इंडिया चित्रपट असून, रश्मिकाच्या व्यक्तिरेखेभोवतीच त्याची कथा फिरताना दिसते. चित्रपटात वडील आणि मुलीच्या नात्याचा भावनिक धागा असून, त्यासोबतच थरारक आणि हाय-ऑक्टेन ॲक्शनचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. महिला-केंद्रित ॲक्शनपट म्हणून ‘मैसा’कडे पाहिले जात आहे.

रश्मिकाचा नवा लूक आणि तिच्या व्यक्तिरेखेतील आक्रमकपणा टीझरचे विशेष आकर्षण ठरत आहे. सोशल मीडियावरही तिच्या या नव्या अवताराची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रश्मिकाला ॲक्शन भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ‘मैसा’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

Hello world!

saurabhsalvi262@gmail.com
0 Min Read

मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट

Gramin Varta
1 Min Read

A Deep Dive into Emerging Trends in Ophthalmic Healthcare Development

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

2 Min Read
महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरण: लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला जबर धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची कडक बंदी

2 Min Read
महाराष्ट्र

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

1 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?