ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मजगाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण जनजागरण व बालविकास उपक्रम उत्साहात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मजगाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण जनजागरण व बालविकास उपक्रम उत्साहात
रत्नागिरी

मजगाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण जनजागरण व बालविकास उपक्रम उत्साहात

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 3:16 pm
Gramin Varta
371 Views
Share

रत्नागिरी: महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत अंगणवाडी मजगाव मुस्लिमवाडी (बीट कोतवडा नंबर १) येथे विविध लोकोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पोषण माह, नवचेतना आणि आधारशिला या संयुक्त मोहिमांन्वये आयोजित या कार्यक्रमात बालकांचे आरोग्य, योग्य पोषण आहार आणि सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शून्य ते तीन वर्षे आणि तीन ते सहा वर्षे या वयोगटातील बालकांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. बालवयातील योग्य पोषण, किशोरवयीन बालिकांचे शारीरिक स्वास्थ, मातांचे आरोग्य आणि महिला व बालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती यावेळी उपस्थित महिलांना देण्यात आली. बालकांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी समुदाय सहभागाचे महत्त्व किती मोठे आहे, याबाबतही यावेळी उपस्थित मान्यवर व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमाला मजगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फैयाज मुकादम, ज्येष्ठ पत्रकार रफीक मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर, ग्रामपंचायत अधिकारी अर्चना कळंबटे, अंगणवाडी सेविका नफिसा मुकादम यांच्यासह गावातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालविकास आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ब्रेकिंग : दाभोळजवळ शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून मिसफायर; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा जखमी

Gramin Varta
2 Min Read

‘आपले सरकार’च्या ऑनलाइन सेवेत लांजाचा झेंडा; पोलीस अंमलदार नितेश राणे राज्यात अव्वल

Gramin Varta
1 Min Read

देवरुख: कुडवलीच्या सांदीपनी गुरुकुल संस्थेत ६२०० वृक्षांच्या जंगलाची निर्मिती

Gramin Varta
2 Min Read

वनप्लसचा बजेट स्मार्टफोन ‘एन६ लाइट ४जी’ लाँच

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

3 Min Read
रत्नागिरी

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

7 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?