ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दादरच्या शिवाजी मंदिरात ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हाऊसफुल्ल; आयोजक दीपक कारकर यांची माहिती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दादरच्या शिवाजी मंदिरात ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हाऊसफुल्ल; आयोजक दीपक कारकर यांची माहिती
महाराष्ट्र

दादरच्या शिवाजी मंदिरात ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हाऊसफुल्ल; आयोजक दीपक कारकर यांची माहिती

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 8:12 pm
Gramin Varta
205 Views
Share

मुंबई : कोकणच्या मातीतील समृद्ध लोकसंस्कृती, अस्सल संगमेश्वरी बोलीचा गोडवा आणि ग्रामीण जगण्यातील विविध कंगोरे मांडणाऱ्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याच्या दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात दिनांक १ नोव्हेंबर रोजी सादर होणाऱ्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सर्व तिकिटांची आगाऊ विक्री होऊन हा प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याची माहिती मुख्य आयोजक दीपक कारकर यांनी दिली आहे. राजापूर ते खेड परिसरामध्ये दैनंदिन बोली म्हणून वापरल्या जाणाऱ्या संगमेश्वरी भाषेला व्यापक प्रतिष्ठा व लोकमान्यता मिळवून देण्यासाठी समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या माध्यमातून साकारलेल्या या कलाकृतीने गेल्या पाच-सहा वर्षांच्या प्रवासात तब्बल ६३० हून अधिक यशस्वी प्रयोगांचा पल्ला गाठला आहे.

मुलुंड येथे संपन्न झालेल्या ९८व्या मराठी नाट्य संमेलनातही विशेष कौतुक मिळवलेल्या या लोकनाट्याची संकल्पना श्री पाणबुडी देवी कलामंच (मुंबई) यांची असून शालिनी फाउंडेशन (मुंबई) प्रस्तुत या प्रयोगाचे यशस्वी संयोजन सामाजिक कार्यकर्ते, निवेदक, पत्रकार तसेच शक्ती-तुरा व नमनच्या चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व दीपक कारकर यांनी केले आहे. प्रयोगामध्ये जाकडी, नमन आणि भजन यांसारख्या पारंपरिक लोककलांचा सुंदर मेळ साधत, तात्या गावकर या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या साहाय्याने गावातील संस्कृतीचा अभ्यास करण्यास आलेल्या मुंबईकराच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे वास्तव अत्यंत खुसखुशीत विनोदी प्रसंगांतून उलगडून दाखवण्यात आले आहे.

केवळ निव्वळ मनोरंजनावर भर न देता रोजगारासाठी कोकणातील तरुणांचे महानगरांकडे वेगाने होणारे स्थलांतर, लोप पावत चाललेला प्राचीन सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक शेतजमिनी विकण्याच्या वाढत्या घातक प्रवृत्तीवर यात सडेतोड सामाजिक भाष्य करण्यात आले असून, आपल्याच जमिनींवर भविष्यात स्थानिकांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून वेळीच जागे होण्याचा परखड विचार या नाट्यातून मांडला गेला आहे. दादरच्या ऐतिहासिक रंगमंचावर रसिकांनी नोंदवलेली ही विक्रमी उपस्थिती मुंबईतील कोकणी जनतेचे आपल्या मातीशी, लोककलांशी आणि परंपरेशी असलेले घट्ट नाते अधोरेखित करणारी ठरली आहे.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

Gramin Varta
3 Min Read

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड शहरावर ऐन ऑक्टोबरमध्येच भीषण पाणीटंचाईचे सावट; जुनी नळपाणी योजना ठरतेय तोकडी

Gramin Varta
2 Min Read

श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळंबेच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान यश

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटाचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित

2 Min Read
महाराष्ट्र

आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या अंगावर अचानक पडला साप; चिमुकला थोडक्यात बचावला

2 Min Read
महाराष्ट्र

कळंबोली यार्डात मालगाडीची ट्रॉली घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत; मांडवी एक्स्प्रेससह चार गाड्यांना फटका

1 Min Read
महाराष्ट्र

मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?