ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बिगरकृषी वीजग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’; संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ, मूळ थकबाकीतही २० टक्क्यांपर्यंत सवलत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बिगरकृषी वीजग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’; संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ, मूळ थकबाकीतही २० टक्क्यांपर्यंत सवलत
महाराष्ट्र

बिगरकृषी वीजग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’; संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ, मूळ थकबाकीतही २० टक्क्यांपर्यंत सवलत

Gramin Varta
Last updated: November 5, 2026 6:54 pm
Gramin Varta
53 Views
Share

मुंबई : दिवाळीच्या शुभपर्वाचे औचित्य साधत महावितरणने वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी लघु व उच्चदाब वर्गवारीतील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. शुक्रवार, ६ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत ही योजना राज्यभरात राबवली जाणार असून, या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांना संपूर्ण व्याज आणि विलंब आकारावर १०० टक्के माफी देण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त २० टक्क्यांपर्यंत घसघशीत सवलत मिळणार असून मागणीनुसार तात्काळ वीज पुनर्जोडणीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रकाशगड येथील मुख्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संचालक धनंजय औंढेकर, अनुदीप दिघे, योगेश गडकरी, सचिन तालेवार आणि राजेंद्र पवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ३१ मार्च २०२६ पर्यंत वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (कृषी व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरतील. ही सवलत महावितरण डिस्ट्रीब्यूशन फ्रॅन्चायझी क्षेत्रातील ग्राहकांसाठीही लागू राहणार आहे.

योजनेनुसार एकूण थकबाकीतील व्याज आणि विलंब आकाराची रक्कम पूर्णपणे माफ होणार असून, मूळ थकबाकी एकरकमी किंवा सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची लवचिक सुविधा ग्राहकांना दिली आहे. योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा लाभ मिळेल. यामध्ये लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना तीन वर्षांपर्यंत खंडित वीजजोडणीवर १० टक्के, तर तीन वर्षांहून अधिक कालावधी असल्यास २० टक्के सवलत दिली जाईल. अन्य लघु व उच्चदाब ग्राहकांसाठी अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलतीची तरतूद आहे. जे ग्राहक हप्त्यांचा पर्याय निवडतील, त्यांना ५० टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी ३ ते ६ समान व्याजमुक्त मासिक हप्ते उपलब्ध करून दिले जातील.

याव्यतिरिक्त २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणी करताना ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ स्वीकारल्यास त्यांना मूळ थकबाकीवर आणखी अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जाईल. तसेच या योजनेतील सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहे. राज्यातील ३४ लाखांहून अधिक कायमस्वरूपी खंडित ग्राहकांकडे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी असून, या योजनेमुळे सुमारे २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. या योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया महावितरणच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टल व मोबाईल ॲपवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

Total Visitors :

5468686
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पोलीस आदेश धाब्यावर बसवून चिपळूण पोलीस ठाण्यासमोर निदर्शने व शांतता भंग; महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

किरणोदय फाउंडेशनतर्फे लांजात १७ ऑक्टोबरला महिलांसाठी भव्य दांडिया गरबा रास सोहळा!

Gramin Varta
3 Min Read

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
2 Min Read

ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेत लांजाच्या कन्येची सुवर्ण भरारी; उपनिरीक्षक स्नेहा करणाळे यांना ५५ किलो गटात रौप्यपदक

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू

2 Min Read
महाराष्ट्र

मनोज जरांगेंनी दिलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल – मुख्यमंत्री

4 Min Read
महाराष्ट्र

पुण्यात हुंड्यासाठी २३ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा अंत; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या

3 Min Read
महाराष्ट्र

पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका; किडनीच्या आजाराचा असू शकतो इशारा! बरगड्यांखाली वेदना, ताप आणि लघवीतील बदल ही पाच लक्षणे ओळखा

5 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?