ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू
महाराष्ट्र

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 8:35 am
Gramin Varta
162 Views
Share

मुंबई: राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. हे वय ३० जून रोजी पूर्ण असणे आवश्यक असून, नवीन निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत.शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार बालवाटिका-१ अथवा नर्सरीच्या प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असण्याचा निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून लागू होईल. बालवाटिका-२ अथवा ज्युनिअर के.जी.साठी चार वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०२८-२९ पासून, बालवाटिका-३ अथवा सिनिअर के.जी.साठी पाच वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०२९-३० पासून, तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०३०-३१ पासून लागू होईल.

राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या दिनांकांनुसार वयोमर्यादा ग्राह्य धरली जात होती. तसेच पूर्व-प्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठी निश्चित वयाची अट अस्तित्वात नव्हती. केंद्र शासनाने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे कळविले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने हे वयाचे निकष निश्चित केले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांना नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनाही पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयाचे निकष लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

पूर्व-प्राथमिक वर्गातील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देता येईल. पायाभूत वर्गांतील नामांकन आणि नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील सूचनांचे पालन करावे लागेल.

नवीन वयोमर्यादेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

Total Visitors :

5468552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बालक व किशोरांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम प्रभावीपणे राबवा; रत्नागिरीत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

Gramin Varta
1 Min Read

भडकंबा येथे कुक्कुटपालन प्रकल्पाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन; महिलांच्या उद्योगभरारीला मिळणार बळ

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : कापडगाव येथील वळणावर भरधाव ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

शिष्यवृत्तीचा निधी रखडल्याने महाविद्यालये आर्थिक संकटात; रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचा आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : कोटा पोलिसांकडून अवघ्या १५ मिनिटांत थरारक सापळा; नेपाळला पळण्याच्या बेतात असलेले तीन संशयित रेल्वेतून जेरबंद

2 Min Read
महाराष्ट्र

पोलिसांच्या सीसीटीव्ही खांबात वीजप्रवाह उतरल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल

2 Min Read
महाराष्ट्र

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

4 Min Read
महाराष्ट्र

गाणे बदलण्यावरून भिवंडीतील हॉटेलमध्ये दोन गटांत तुफान राडा; गोळीबार अन् चॉपरने हल्ला, ११ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?