ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पोलिसांच्या सीसीटीव्ही खांबात वीजप्रवाह उतरल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पोलिसांच्या सीसीटीव्ही खांबात वीजप्रवाह उतरल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र

पोलिसांच्या सीसीटीव्ही खांबात वीजप्रवाह उतरल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 8:27 am
Gramin Varta
143 Views
Share

उल्हासनगर : पोलीस विभागामार्फत शहराच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लोखंडी खांबात अचानक वीजप्रवाह उतरल्याने एका २६ वर्षीय तरुणीचा जागीच विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उल्हासनगरात घडली आहे. कॅम्प क्रमांक ३ मधील ओटी सेक्शन चौक परिसरात १८ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणाऱ्या संबंधित खासगी कंपनीच्या ठेकेदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा माधवानी (वय २६) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरातील प्रसिद्ध झुलेलाल चालिया उत्सवात सहभागी होऊन करिश्मा माधवानी ही आपला भाऊ मोहित माधवानी याच्यासोबत १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरी परतत होती. दोघे बहीण-भाऊ पावसात भिजलेल्या अवस्थेत त्यांच्या गणेश गंगा इमारतीजवळ पोहोचले. त्यावेळी मोहितने हातातील प्रसादाची पिशवी करिश्माकडे सोपवली आणि तो स्वतःची स्कूटी पार्क करण्यासाठी थांबला. करिश्मा घराच्या दिशेने चालत जात असताना इमारतीजवळच पोलिसांसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या लोखंडी खांबाला तिचा नकळत स्पर्श झाला. मुसळधार पावसामुळे खांबामध्ये आधीच उच्च दाबाचा वीजप्रवाह उतरलेला असल्याने करिश्माला विजेचा जोरदार झटका बसला आणि ती क्षणात जमिनीवर कोसळली.

भाऊ गाडी पार्क करून वळताच करिश्मा बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली, ज्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. या धक्कादायक घटनेनंतर मध्यवर्ती पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संपूर्ण शहरात पोलिसांच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम ‘मॅट्रिक्स स्मार्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या शासकीय ठेकेदार कंपनीकडे सोपवण्यात आले होते. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठेकेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा जीवघेणा प्रकार संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घडला की महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाला, याचा पोलीस सखोल तांत्रिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस परिमंडळ-४ उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. एका निष्पाप तरुणीचा सार्वजनिक उपकरणातील हलगर्जीपणामुळे जीव गेल्याने नागरिकांमधून महावितरण आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले जात आहेत.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

Gramin Varta
3 Min Read

सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ; कोकणनगर आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरासह वृक्षारोपण

Gramin Varta
2 Min Read

दापोलीच्या मातीतल्या शुभम लोंढेची राष्ट्रीय स्तरावर धडक; पॉवरलिफ्टिंगमध्ये दुहेरी रौप्यपदक पटकावत उंचावला महाराष्ट्राचा झेंडा

Gramin Varta
2 Min Read

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

1 Min Read
महाराष्ट्र

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

2 Min Read
महाराष्ट्र

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

2 Min Read
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुक : महाराष्ट्रातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?