ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप तपासासाठी एसआयटी स्थापन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप तपासासाठी एसआयटी स्थापन
महाराष्ट्र

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप तपासासाठी एसआयटी स्थापन

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 8:40 am
Gramin Varta
2 Views
Share

अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटी

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्रिस्तरीय एसआयटीची स्थापना केली आहे. या समितीची संपूर्ण जबाबदारी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष : शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त), सदस्य : विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त) आणि सदस्य : बजरंग बनसोडे (पोलीस उपायुक्त) यांचा समावेश आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करून त्यामागील सूत्रधारांचा चेहरा समोर आणावा, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली होती.

चौकशीच्या मुळाशी जाणे गरजेचे – जरांगे

दरम्यान एसआयटीच्या स्थापनेनंतर जरांगेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. फक्त एसआयटी गठीत करून छक्के-पंजे खेळू नका, तर या चौकशीच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. तसेच ही ऑडिओ क्लिप कोणतीही एआय जनरेटेड नसून 100 टक्के खरी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. एवढी मोठी क्लिप एआयच्या माध्यमातून बनवताच येत नाही, असा दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ही क्लिप संपूर्ण देशात व्हायरल होत आहे. या क्लिपमधील विचार अत्यंत विखारी असून हे प्लॅनिंग मोडीत काढले पाहिजे. एसआयटी प्रमुख शैलेश बलकवडे हे जालन्याचे एसपी राहिलेले आहेत, ते देवेंद्र फडणवीसांचे खास असले तरी त्यांचे काम निष्पक्ष असले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी एक खळबळजनक सवाल उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न होता का? शिंदे आणि फडणवीस यांच्यात मोठी खदखद आहे. जर या चौकशीच्या खोलात गेले तर फडणवीसांचाही गेम केला जाणार होता, हे उघड होईल, असं जरांगे म्हणाले.

Total Visitors :

5469384
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डोंगर-दऱ्यांचे खडतर आव्हान पेलत महावितरणचे ‘मिशन म्हाप्रळ’ फत्ते; ४८ तासांच्या अथक परिश्रमांनंतर परिसर पुन्हा प्रकाशमान

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

पालवणच्या पाणी कमिटी अध्यक्षपदी भरत सावर्डेकर यांची बिनविरोध निवड; पहिल्याच सभेत पारदर्शक कारभाराचा ऐतिहासिक निर्णय

Gramin Varta
2 Min Read

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेला मिळणार बळकटी; १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दिवेआगर समुद्रकिनारी ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहलीतील निष्काळजीपणाप्रकरणी अकॅडमीच्या पाच जणांवर गुन्हा

1 Min Read
महाराष्ट्र

‘दिशा सालियनला कधीही भेटलो नाही, खोट्या प्रचाराने झुकणार नाही’; सीबीआयच्या एफआयरनंतर आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

3 Min Read
महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार; राज्यात उभारणार २० हजार सुसज्ज कायमस्वरूपी परीक्षा केंद्रांचे सामायिक जाळे

2 Min Read
महाराष्ट्र

डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?