ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती
रत्नागिरी

रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती

Gramin Varta
Last updated: October 24, 2026 12:55 pm
Gramin Varta
129 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाची धुरा शिक्षण क्षेत्रातील ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले नागनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर २०२६ पासून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे मागील काही काळापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे आता पुन्हा आपल्या मूळ उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत राहणार आहेत.

नागनाथ शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षकापासून विविध उच्च पदांपर्यंत उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांनी १९९१ ते २००६ या काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर २००६ ते २०११ दरम्यान श्रीरामपूर पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी, २०११ ते २०१५ मध्ये गेवराई, तर २०१५ ते २०१९ मध्ये अंबाजोगाई येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच २०१९ ते २०२२ या काळात पुन्हा जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. यानंतर २०२२ ते २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद, बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि २०२५ ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत लातूर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. या व्यापक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांची रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी वर्णी लागली आहे.

मागील वर्षभरात माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना दीपक मेंगाणे यांनी पदाची प्रतिष्ठा राखत पारदर्शक, गतिमान आणि लक्षवेधी कामकाजावर भर दिला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण व्यवस्थेला न्याय देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

दरम्यान, शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या नागनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचे शिक्षण विभागातील कर्मचारी आणि विविध शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.पदभार स्वीकारल्यानंतर दीपक मेंगाणे, संदेश कडव यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनी शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :

5470357
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल

Gramin Varta
1 Min Read

दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये महिला व मुलींचे छुप्या पद्धतीने फोटो काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर रेल्वे पोलिसांची कारवाई

Gramin Varta
2 Min Read

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

एमपीएससी अध्यक्षपदाचा सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार;चौकशी आयोगाची अधिसूचनाही जारी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

अपघातावर जिद्दीने मात करत गुरुनाथ डोंगळे यांची स्वावलंबनाकडे वाटचाल; आर एच पी फाउंडेशनतर्फे मिळाली ‘निओमोशन’ इलेक्ट्रॉनिक गाडी

3 Min Read
रत्नागिरी

खेडशी-पारसनगरमध्ये नवरात्रोत्सव गरबा मंडपाजवळ पहाटे बिबट्याची चाहूल; दाट लोकवस्तीत भीतीचे सावट

2 Min Read
रत्नागिरी

२० दिवसांच्या चिमुकल्याचा रत्नागिरीपर्यंत साडेसहा लाखांना सौदा; आईच्या कुशीतून हिरावलेल्या बाळाची २४ तासांत सुटका, १० जणांना बेड्या!

4 Min Read
रत्नागिरी

सेवा संकल्प अभियानांतर्गत रत्नागिरीत सॅम-मॅम व दुर्धर आजारग्रस्त बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?