ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: २० दिवसांच्या चिमुकल्याचा रत्नागिरीपर्यंत साडेसहा लाखांना सौदा; आईच्या कुशीतून हिरावलेल्या बाळाची २४ तासांत सुटका, १० जणांना बेड्या!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » २० दिवसांच्या चिमुकल्याचा रत्नागिरीपर्यंत साडेसहा लाखांना सौदा; आईच्या कुशीतून हिरावलेल्या बाळाची २४ तासांत सुटका, १० जणांना बेड्या!
रत्नागिरी

२० दिवसांच्या चिमुकल्याचा रत्नागिरीपर्यंत साडेसहा लाखांना सौदा; आईच्या कुशीतून हिरावलेल्या बाळाची २४ तासांत सुटका, १० जणांना बेड्या!

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 10:17 am
Gramin Varta
399 Views
Share

रत्नागिरी : जगात येऊन अवघे २० दिवस झालेले बाळ… ज्याला अजून आईच्या कुशीशिवाय जगाची ओळखही नाही, अशा निष्पाप जीवाचा पैशांसाठी बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या मायेपासून दूर करत या चिमुकल्याच्या विक्रीचा अडीच लाख रुपयांपासून सुरू झालेला सौदा वेगवेगळ्या मध्यस्थांच्या हातातून जात तब्बल साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. जालना ते रत्नागिरी असा या बाळाचा प्रवास सुरू असताना मुंब्रा पोलिसांनी वेळीच सूत्रे हलवत अवघ्या २४ तासांत या अमानुष प्रकाराचा पर्दाफाश केला. बाळाला रत्नागिरीतून सुखरूप ताब्यात घेत दहा जणांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका निष्पाप जीवाच्या आयुष्याचा पैशांसाठी लिलाव करणाऱ्या या प्रकाराने माणुसकीलाच काळिमा फासला आहे.

कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणारी अनिसा रफीक शेख (१९) ही मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करते. तिच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाच्या विक्रीसाठी रेहान रिजवान शेख (२२) याने दबाव आणल्याचा आरोप आहे. या बाळाचा अडीच लाख रुपयांना सौदा ठरविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. हा प्रकार बाहेर उघड होऊ नये यासाठी फिर्यादीला १ लाख ९५ हजार रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर फिर्यादी आणि तिची बहीण अलकीशा यांना वायरने मारहाण करून ही रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका नवजात बाळाला आईपासून दूर करण्याबरोबरच संबंधित महिलांनाही मारहाण करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

याप्रकरणी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बाळाची सुखरूप सुटका करण्यासह संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपासासाठी पाच स्वतंत्र पथके तयार केली. महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, प्रशांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक तेजस सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक राम दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही पथके तपासासाठी रवाना झाली.

तपासादरम्यान बाळाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याचे आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या विक्रीचा व्यवहार होत गेल्याचे उघड झाले. सुरुवातीला अडीच लाख रुपयांना ठरलेला हा सौदा मध्यस्थांच्या सहभागामुळे तब्बल साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. या प्रकरणात अनेक जण सहभागी असल्याचा संशय असून, बाळाच्या विक्रीसाठी मोठी साखळी कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी ज्योती नरेश पाटील (३५), रेहान रिजवान शेख (२२), फरहान ऊर्फ फरौ रेहान शेख (२१), फरिदा अकबर सय्यद (५२) आणि हुरना ऊर्फ हुस्ना अल्ताफ शेख (२७) यांना अटक केली. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी अनिता गोपीनाथ धोत्रे (४२), सुनीता प्रविण खैरनार (३०), गोपीनाथ किसन धोत्रे (४६), प्रतिमा प्रकाश परब (४६) आणि शिल्पा प्रदीप साठे (३४) यांना अटक करण्यात आली. आरोपी गोपीनाथ धोत्रे याला पोलिसांच्या एका पथकाने जालना येथून ताब्यात घेतले, तर दुसऱ्या पथकाने रत्नागिरीपर्यंत धाव घेत बाळाचा शोध लावला. अखेर या चिमुकल्याला सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

सुटका करण्यात आलेल्या बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसार त्याला डोंबिवली येथील जननी आशीष संस्था येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. बाळाच्या पुढील संगोपनाबाबत बालकल्याण समितीच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अशोक दुधे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे नवजात बालकांची विक्री केली आहे का, या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत आणि बाळांच्या खरेदी-विक्रीचे आणखी व्यवहार झाले आहेत का, याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. एका २० दिवसांच्या निष्पाप बाळाला पैशांच्या हव्यासापोटी आईच्या कुशीपासून दूर करून विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरविण्यात आल्याच्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. वेळेत पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता, तर या चिमुकल्याचे पुढे काय झाले असते, हा प्रश्नच मन हेलावून टाकणारा आहे.

Total Visitors :

5468675
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेशोत्सवापूर्वी चिपळूणच्या रस्त्यांची डागडुजी करा

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

शहरातील पुतळ्यांजवळील बंद सीसीटीव्ही सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी, एसपी बगाटे यांच्याकडून तत्काळ सूचना

Gramin Varta
2 Min Read

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

Gramin Varta
2 Min Read

लांजा : पालू कुंभारवाडीत जमिनीच्या मोजणीवरून तुंबळ हाणामारी; पाच जणांवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

2 Min Read
रत्नागिरी

सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे पर्यटकांनी गजबजले; हिवाळी पर्यटनाला प्रारंभ, वॉटर स्पोर्ट्स ठरताहेत खास आकर्षण

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीतील पर्यटन प्रकल्प पालिकेच्या तिजोरीवर भार; थ्रीडी शो, शिवसृष्टीच्या खर्चाचा ताळमेळ बिघडला!

2 Min Read
रत्नागिरी

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?