ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल
राजापूर

राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:23 am
Gramin Varta
75 Views
Share

नदी-नाले कोरडे पडल्याने पिके सुकण्याच्या उंबरठ्यावर; ओल्या दुष्काळानंतर आता सुक्या दुष्काळाची भीषण सावली

पाचल / काजिर्डा (अंकुश पोटले): राजापूर तालुक्यातील पाचल पूर्व परिसरातील अनेक गावांमधील हातातोंडाशी आलेली भातशेती निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे संकटात सापडली असून, ऐन भरात आलेली पिके कापणीपूर्वीच सुकून जाण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत. पिकाला दाणा भरण्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने वर्षभराच्या कष्टाचे पीक शेतकऱ्याच्या हाती लागेल की नाही, याबाबत आता तीव्र साशंकता आणि घोर निराशा पसरली आहे.

पावसाच्या तीव्र टंचाईमुळे बाहेर पडलेली भाताची लोंब (केसर) करपू लागली असून, त्यावर पिकाचा आवश्यक तो अवसर चढत नसल्याची विदारक परिस्थिती शेतांमध्ये पाहायला मिळत आहे. मध्यंतरी एखाद्या पाहुण्यासारखी केवळ एका दिवसापुरती हजेरी लावून पावसाने पुन्हा काढता पाय घेतल्याने शेतकरी वर्गाची चिंता अधिकच वाढली आहे. हवामानात पुन्हा पावसाची चिन्हे दिसत नसून, पाण्याचा साठा शिल्लक न राहिल्याने परिसरातील नदी-व्हाळ पूर्णपणे सुकून कोरडेठाक पडले आहेत.

निसर्गाच्या या अस्मानी संकटामुळे यंदा शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊन हातात केवळ माती पडणार, अशीच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला अतिवृष्टीचा फटका सहन केल्यानंतर आता थेट सुक्या दुष्काळाची परिस्थिती ओढवल्याने बळीराजा दोन्ही बाजूंनी दुतर्फा होरपळून निघाला आहे. नद्या-नाले आटल्याने आणि पाऊस गायब झाल्याने अशा कठीण समयी नेमकं काय करावं, या विवंचनेत संपूर्ण पाचल परिसरातील शेतकरी वर्ग सापडला आहे.

Total Visitors :

5435550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

Gramin Varta
2 Min Read

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीचा नवा अध्याय; हवाई दलाच्या ताफ्यात ‘तेजस’सह ‘HTT-40’ दाखल, नागरी उड्डाणासाठी ‘ध्रुव NG’ सज्ज

Gramin Varta
2 Min Read

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

Gramin Varta
2 Min Read

विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर : नाटे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तीन घरफोडीचे गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

2 Min Read
राजापूर

राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश

2 Min Read
राजापूर

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

1 Min Read
राजापूर

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?