ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर आगाराच्या मनमानी कारभाराचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका; साखर कोंबेत चार-चार तास ताटकळणाऱ्या मुलांचे हाल, सरपंचांचा आंदोलनाचा इशारा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर आगाराच्या मनमानी कारभाराचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका; साखर कोंबेत चार-चार तास ताटकळणाऱ्या मुलांचे हाल, सरपंचांचा आंदोलनाचा इशारा
राजापूर

राजापूर आगाराच्या मनमानी कारभाराचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका; साखर कोंबेत चार-चार तास ताटकळणाऱ्या मुलांचे हाल, सरपंचांचा आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 10:53 am
Gramin Varta
75 Views
Share

राजापूर:  तालुक्यातील साखर कोंबे येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नियोजनशून्य कारभारामुळे दररोज प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा सुटल्यानंतरही बस उपलब्ध नसल्याने कोवळ्या विद्यार्थ्यांना तब्बल चार तास शाळेच्या आवारात ताटकळत बसावे लागत असून, प्रशासनाने तातडीने फेऱ्या सुरळीत न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा सक्त इशारा स्थानिक सरपंच दशरथ मांजरेकर यांनी दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर राजापूर आगाराकडून जैतापूर-साखर कोंबे मार्गे राजापूर अशी बस फेरी सुरू करण्यात आली होती. एसटीच्या या वेळापत्रकाचा मेळ बसावा म्हणून शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी सामंजस्य दाखवून शाळेची वेळ बदलून घेतली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर घरी पोहोचून दैनंदिन अभ्यास पूर्ण करता येईल. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही बस ठरलेल्या वेळेवर न येता थेट रात्री सात ते साडेसातच्या सुमारास शाळेच्या आवारात दाखल होत आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजता सुटणाऱ्या शाळेतील मुले रात्री आठ वाजेपर्यंत रस्त्यावरच अडकून पडत असल्याचे संतापजनक चित्र निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील जंगलमय, कच्च्या रस्त्यांवरून रात्रीच्या सुमारास प्रवास करताना जंगली आणि सरपटणाऱ्या श्वापदांचा मोठा धोका विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकतो. थकलेल्या आणि उपाशीपोटी घरी पोहोचणाऱ्या या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होणार कसा, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. या गंभीर समस्येबाबत राजापूर आगाराचे अधिकारी कदम यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून अवगत करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, एखादी अनुचित दुर्घटना घडल्यास त्याला पूर्णपणे राजापूर एसटी महामंडळच जबाबदार असेल, असा इशारा देत ग्रामस्थांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

Total Visitors :

5468468
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; शासनाकडुन ७५०० कोटींच्या मदतीची घोषणा

Gramin Varta
4 Min Read

गुहागर तालुक्यातील तळवली परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पाहणी करत ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Gramin Varta
1 Min Read

लोकशाही वाचवा, अराजकता हटवा अभियानांतर्गत गुहागर येथे ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

Gramin Varta
3 Min Read

निवे खुर्द येथे उताराच्या धोकादायक वळणावर खडीने भरलेला डंपर उलटला; चालकाविरोधात गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ येथे भीषण अपघात; भरधाव इनोव्हाच्या धडकेत रिक्षातील दोन बालकांसह पाच जण गंभीर जखमी

1 Min Read
राजापूर

राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल

1 Min Read
राजापूर

राजापूर : कोळवणखडीत भाजपाला बळ; तीन ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांचा पक्षात प्रवेश

2 Min Read
राजापूर

पाचल शाळेच्या परिसरातील बिबट्यांच्या वावराबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने वृत्त प्रसारित करताच वनविभाग ॲक्शन मोडवर

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?