गुहागर : भाजपा प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग!
लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे जतन, तसेच देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुहागर येथील भाजपा कार्यालयात उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचा ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपा प्रदेश सचिव तथा उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीची मूलभूत तत्त्वे, देशासमोरील विविध आव्हाने, लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण आणि राष्ट्रहिताच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका, जनतेमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच संघटनात्मक पातळीवर अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, भाजपा महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, जलगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपाचे जेष्ठ नेते राजू रेडीज, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा सोशल मीडिया उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक वैभव नारकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा चिपळूण तालुका सरचिटणीस गणेश हळदे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या अभियानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचे रक्षण, राष्ट्रहिताची जाणीव आणि संघटनात्मक एकजूट अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. गुहागर येथे पार पडलेल्या या ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विचारमंथन झाले.





