ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: एमपीएससी अध्यक्षपदाचा सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार;चौकशी आयोगाची अधिसूचनाही जारी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » एमपीएससी अध्यक्षपदाचा सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार;चौकशी आयोगाची अधिसूचनाही जारी
महाराष्ट्र

एमपीएससी अध्यक्षपदाचा सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार;चौकशी आयोगाची अधिसूचनाही जारी

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 8:13 am
Gramin Varta
19 Views
Share

मुंबई: परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.

या संदर्भात राज्य सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले, तसेच अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या रजेवर जाण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान भीमनवार यांच्या रजेच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यावतीनं हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अन्न व औषध प्रशासनाची औषध निरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचं स्पष्ट होताच विद्यार्थ्यांनी आयुक्त विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. राज्य सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 दिवस पुण्यात आंदोलन करण्यात आलं होतं. हे आंदोलन सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती.

सतीश वाघोले हे सप्टेंबर 2026 मध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. 7 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून भीमनवार यांनीच वाघोले यांना सदस्य म्हणून गोपनीयतेची शपथ दिली होती. आता एका महिन्यानंतर बदलेल्या परिस्थितीमुळे सतीश वाघोले यांच्यावर अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून पुण्यातील विद्यार्थी आंदोलकांसोबत चर्चा करताना आयोगातील गैरप्रकार आणि पेपरफुटी संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याचा शब्द देण्यात आला होता, त्यानुसार चौकशी आयोगाची अधिसूचना काढण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील. निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह पाच सदस्यांचा आयोगात समावेश आहे. तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचा आयोगात समावेश आहे.

अलीकडील पेपरफुटीसाठी जबाबदार असल्याच्या आरोपांनंतर दोन आठवड्यांपूर्वी माजी सचिव महेंद्र हरपाळकर यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. सरकारने मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना एमपीएससी सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही दिला आहे. मंत्रालय संवर्गातील सहसचिव दर्जाचे अधिकारी असलेले हरपाळकर डिसेंबर २०२५ पासून एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते.

Total Visitors :

5468468
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष

Gramin Varta
2 Min Read

गणपतीपुळे मंदिरात ‘सामवेद स्वाहाकार’ सोहळ्यास प्रारंभ; पाच दिवस रंगणार ज्ञान आणि भक्तीचा संगम

Gramin Varta
1 Min Read

खेडच्या चंदुलाल शेट प्रशालेत ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; कलेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे दर्शन

Gramin Varta
1 Min Read

पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने गिळली ३ तोळ्यांची सोनसाखळी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अंडर-१९ आशिया चषक : भारताचा नेपाळवर १० गडी राखून दणदणीत विजय

2 Min Read
महाराष्ट्र

पुण्यातील नामांकित झांबरे पॅलेसच्या सुनेची आत्महत्या; छळाच्या आरोपावरून माहेरच्या नातेवाइकांकडून झांबरे पॅलेसची तोडफोड

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू

1 Min Read
महाराष्ट्र

राजकीय मतभेद विरघळले, हास्यरेषा जुळल्या; फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?