ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने गिळली ३ तोळ्यांची सोनसाखळी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने गिळली ३ तोळ्यांची सोनसाखळी
महाराष्ट्र

पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने गिळली ३ तोळ्यांची सोनसाखळी

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:03 am
Gramin Varta
Share

नाशिक: बैलपोळ्याच्या सणाला पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत चक्क तीन तोळे वजनाची सोन्याची पोत गिळणाऱ्या बैलावर चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तज्ज्ञ डॉक्टरांनी बैलाच्या पोटातील मौल्यवान दागिन्यांसह घातक प्लास्टिकचे गोळे बाहेर काढत त्याला नवे जीवनदान दिले आहे.

मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला जात होता. बैलांचे विधीवत पूजन करून नैवेद्य दाखवत असताना एका बैलाने नैवेद्याच्या ताटातील सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत फस्त केली. बोरसे यांच्याकडे दोन बैल असल्याने नेमकी सोनसाखळी कोणाच्या पोटात गेली, यावरून सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. गिळलेला दागिना शेणाच्या वाटे बाहेर येईल या आशेने बोरसे परिवाराने सुमारे आठ ते दहा दिवस प्रतीक्षा केली. मात्र, तसे न झाल्याने दागिन्यापेक्षा बैलाचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे मानून त्यांनी दोन्ही बैलांना चाळीसगाव येथील तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात तपासणीसाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तातडीने दोन्ही बैलांची क्ष-किरण तपासणी (एक्स-रे) केली. या तपासणीत पोत गिळलेला बैल तर स्पष्ट झालाच, शिवाय पचनसंस्थेतील नेमक्या कुठल्या भागात दागिना अडकला आहे याचेही अचूक निदान झाले.

रोगाचे नेमके स्थान स्पष्ट होताच वैद्यकीय पथकाने विलंब न लावता तातडीने क्लिष्ट शस्त्रक्रिया हाती घेतली. डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने केलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान बैलाच्या पोटातून सोन्याची माळ, त्यासोबत असलेले ६३ मणी आणि पोटातील इतर भागांत पसरलेले उर्वरित ४१ मणी सुरक्षितपणे बाहेर काढले. केवळ सोनेच नव्हे, तर चाऱ्यासोबत पोटात गेलेले टेनिस बॉलच्या आकाराचे सुमारे अर्धा किलो वजनाचे दोन प्लास्टिकचे गोळे, नायलॉनचा धागा, एक रुपयाची दोन नाणी आणि दोन रुपयांचे एक नाणे अशा अत्यंत घातक वस्तूही डॉक्टरांनी बाहेर काढल्या. डॉक्टरांच्या या समयसूचक आणि यशस्वी प्रयत्नांमुळे शेतकऱ्याचा बहुमूल्य दागिना तर परत मिळालाच, शिवाय मुक्या जनावराचे प्राणही सुखरूप वाचले.

Total Visitors :

5428588
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश

Gramin Varta
3 Min Read

राजापूर पालिकेतर्फे 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत योग प्रशिक्षण शिबिर

Gramin Varta
1 Min Read

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

Gramin Varta
1 Min Read

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

2 Min Read
महाराष्ट्र

गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छतेचा कहर; चाकरमान्यांचा संताप, डबे-शौचालयांच्या अवस्थेचे व्हिडीओ व्हायरल

3 Min Read
महाराष्ट्र

आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या अंगावर अचानक पडला साप; चिमुकला थोडक्यात बचावला

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?