ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
महाराष्ट्र

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 8:30 am
Gramin Varta
45 Views
Share

मुंबई: मुंबईतील सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रेलिंगला धडकून पुलावरून सुमारे ४० ते ५० फूट खाली कोसळली.

या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शानय गज्जल (वय २१), धिर्या सेठ (वय १७) आणि २५ वर्षीय एका अनोळखी तरुणाचा समावेश आहे. जखमींमध्ये २० वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नायर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

कोस्टल रोडवरील लाला लजपतराय महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार वरळी येथून हाजीअलीच्या दिशेने जात होती. लोटस जेटीजवळ आल्यानंतर भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यालगतचा विजेचा खांब आणि दिशादर्शक फलक तोडत रेलिंगला धडक दिली आणि पुलावरून थेट खाली कोसळली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

अपघातानंतर कारमधील जखमींना तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. पहाटेची वेळ असल्याने अपघाताची माहिती तत्काळ समोर आली नाही. त्यामुळे जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात काहीसा विलंब झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोस्टल रोडवर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कारचा वेग अत्याधिक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारमधील तरुणांनी मद्यपान केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. ताडदेव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत आहे. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आहे.

प्राथमिक तपासात अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार सिल्वासा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील चारही तरुण-तरुणी गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे कोस्टल रोडवरील वेगमर्यादा आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथील पाथरे कुटुंबीयांचा गणेशोत्सव ठरतोय कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

Gramin Varta
2 Min Read

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात लागू होणार; केंद्राकडून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाखांचे अनुदान जाहीर

3 Min Read
महाराष्ट्र

टाटा मोटर्सने टाटा सिएरा ‘डार्क एडिशन’ केले लाँच

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?