ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ठाण्यात किल्ला व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी महापौर अशोक वैती यांच्याकडून बालकांच्या कलाकृतींची प्रत्यक्ष पाहणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ठाण्यात किल्ला व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी महापौर अशोक वैती यांच्याकडून बालकांच्या कलाकृतींची प्रत्यक्ष पाहणी
महाराष्ट्र

ठाण्यात किल्ला व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी महापौर अशोक वैती यांच्याकडून बालकांच्या कलाकृतींची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 12:47 pm
Gramin Varta
27 Views
Share

ठाणे: दिवाळीच्या औचित्यावर संस्कृती, परंपरा आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला व रांगोळी स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्व. बारकू वैती प्रतिष्ठान आणि श्री साईधाम आनंद संस्था, काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ३८ वर्षांची अखंड परंपरा जपत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमात यंदाही लहान मुलांनी कल्पकतेतून गडकिल्ले साकारले, तर महिला व तरुणींनी विविध सामाजिक व कलात्मक विषयांवर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या.

या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे जनसेवक तथा ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून साईनाथ नगर, रमाबाई नगर, लुईसवाडी, जिजामाता नगर, रामचंद्रनगर, काजूवाडी आणि वैतीनगर या भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांनी मुलांनी साकारलेल्या किल्ल्यांची आणि महिलांच्या रांगोळी सजावटीची बारकाईने पाहणी करत चिमुकल्यांशी आस्थेने संवाद साधला व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. एका ज्येष्ठ लोकप्रतिनिधीने थेट आपल्या दारात येऊन कलाकृतीचे कौतुक केल्याने बालचमूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रे जाहीर करण्यात आली आहेत. किल्ला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ३,३३३ रुपये, द्वितीय क्रमांकास २,२२२ रुपये आणि तृतीय क्रमांकास १,१११ रुपये, तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकास २,२२२ रुपये, द्वितीय क्रमांकास १,१११ रुपये आणि तृतीय क्रमांकास ५५५ रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान नागरिकांना या कलाकृती पाहण्यासाठी खुले प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

या तीन दिवसीय महोत्सवाचा सांगता समारंभ काजूवाडी येथील सिद्धिविनायक चौक परिसरातील श्री साईबाबा मंदिरात भव्य दीपोत्सवाने उत्साहात पार पडला. नव्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि सण-उत्सवांचे सांस्कृतिक मूल्य रुजवण्यासाठी हा ३८ वर्षांचा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल आयोजक अशोक बारकू वैती यांनी सर्व नागरिक, महिला आणि बालकांचे आभार मानले.

Total Visitors :

5469400
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अंतरा फाउंडेशनतर्फे संगमेश्वर परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी जाऊन केला गौरव

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : नायरी येथे सुनेच्या मारहाणीत जखमी झालेल्या ९१ वर्षांच्या आजींची अखेर मृत्यूशी झुंज संपली

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

सहदेव बेटकर यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे वादळात खंडित झालेला शेणवडेतील वीजपुरवठा पूर्ववत; तीन वाड्या प्रकाशमान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नाशिकमध्ये धार्मिक विधीच्या बहाण्याने आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार; फरार भोंदूबाबा खंडेश्वर महाराज गजाआड

1 Min Read
महाराष्ट्र

ओला, उबरसह खाजगी टॅक्सींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; भाडे वाटपात पारदर्शकता आणण्यावर भर

2 Min Read
महाराष्ट्र

शालेय पोषण आहारात आता भरडधान्यांची चव; ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

2 Min Read
महाराष्ट्र

खामगाव-पंढरपूर महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?