ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अंतरा फाउंडेशनतर्फे संगमेश्वर परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी जाऊन केला गौरव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अंतरा फाउंडेशनतर्फे संगमेश्वर परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी जाऊन केला गौरव
संगमेश्वर

अंतरा फाउंडेशनतर्फे संगमेश्वर परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी जाऊन केला गौरव

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 3:29 pm
Gramin Varta
133 Views
Share

संगमेश्वर : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी आंबेड बुद्रुक येथील ‘अंतरा फाउंडेशन’च्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. समाजासाठी अहोरात्र राबणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या सन्मान दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद केंद्र शाळा संगमेश्वर नंबर दोन येथील आदर्श शिक्षिका रेखा जाधव, रामपेठ येथील अंगणवाडी सेविका पल्लवी सचिन शेरे, मदतनीस शीतल दिनेश अंब्रे तसेच संभाजीनगर येथील मदतनीस माया जाधव यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल नावडी परिसरातील आशा सेविका वृषाली विनय मुरकर, संभाजीनगर येथील सारिका विशाल पवार आणि रामपेठ येथील आशा सेविका अर्पिता विजयानंद शेट्ये यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी थेट घरी येऊन केलेल्या या सन्मानामुळे सर्व सेविका आणि शिक्षिकांनी मनस्वी समाधान व्यक्त केले.

दौऱ्यादरम्यान संभाजीनगर येथे नवदुर्गा देवीच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश पवार आणि उपाध्यक्ष आकाश कुऱ्हाडे यांनी अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा नुपुरा उन्मेष मुळ्ये, सचिव राजेश आंबेकर, उपाध्यक्षा सरिता आंबेकर, कार्यकर्त्या सुमनताई झगडे, रोहिणी सुर्वे तसेच नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाई अंब्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी पाग-आळी येथील निनावी देवी मंदिरात तसेच घनश्याम प्रसादे यांच्या घरगुती नवरात्रोत्सवात जाऊन दर्शन घेतले.

या दौऱ्यात निधळेवाडी येथे स्थापन केलेल्या दुर्गामातेचे दर्शन घेऊन उपस्थित महिला वर्गाशी संवाद साधण्यात आला. यावेळी अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा नुपुरा मुळ्ये आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी ग्रामीण महिला दिन, वाचन प्रेरणा दिन, नवरात्रोत्सवाचे सामाजिक महत्त्व यासह ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निधळेवाडी येथील उदयोन्मुख युवा गायिका गौतमी वाडकर हिचाही शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन नवदुर्गा सन्मान करण्यात आला. महिलांच्या सन्मानासोबतच सामाजिक प्रबोधनाची जोड देणारा हा संपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

Total Visitors :

5469363
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गोवळकोट व पेठमापमधील मचूळ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ मैदानात

Gramin Varta
2 Min Read

पेण-खोपोली मार्गवार ट्रेलरच्या धडकेत स्कुटीस्वार ठार; चालक अटकेत

Gramin Varta
1 Min Read

लांजा येथे आज ‘स्वरबहार’ संगीतसंध्येचे आयोजन

Gramin Varta
1 Min Read

दादरच्या शिवाजी मंदिरात ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हाऊसफुल्ल; आयोजक दीपक कारकर यांची माहिती

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

ब्रेकिंग : मानसकोंड येथे टायर फुटल्याने थांबलेल्या ट्रकला मागून धडक; क्लिनर जखमी

2 Min Read
संगमेश्वर

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर डंपर पलटी; निवेखुर्द येथील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर सप्तलिंगी येथे कारचा भीषण अपघात; डोंबिवलीचे दोन तरुण गंभीर जखमी

2 Min Read
संगमेश्वर

आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?