ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग : मानसकोंड येथे टायर फुटल्याने थांबलेल्या ट्रकला मागून धडक; क्लिनर जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग : मानसकोंड येथे टायर फुटल्याने थांबलेल्या ट्रकला मागून धडक; क्लिनर जखमी
संगमेश्वर

ब्रेकिंग : मानसकोंड येथे टायर फुटल्याने थांबलेल्या ट्रकला मागून धडक; क्लिनर जखमी

Gramin Varta
Last updated: November 6, 2026 8:32 am
Gramin Varta
271 Views
Share

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे आज शुक्रवारी सकाळी दोन अवजड ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त वाहनातील क्लिनर जखमी झाला असून त्याला तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही ट्रकांचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात आज शुक्रवारी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. पुण्यावरून रत्नागिरीच्या दिशेने येत असलेला ट्रक (क्रमांक MH 09 EM 7061) मानसकोंड परिसरात आला असता अचानक त्याचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. मात्र त्याच दरम्यान मागून मुंबईवरून केरळच्या दिशेने जाणारा भरधाव ट्रक (क्रमांक KL 01 AP 9087) आला. मानसकोंड येथील वळणावर चालकाला रस्त्यालगत उभा असलेला ट्रक वेळेत न दिसल्याने पाठीमागून येणाऱ्या या ट्रकने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या धडकेमध्ये केरळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा क्लिनर (अफजल , वय 27, केरळ) जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमीला बाहेर काढले व संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या अपघाताबाबत पोलीस पंचनामा अथवा अधिकृत गुन्ह्याची नोंद करण्याबाबतची प्रक्रिया याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

बुद्धविहार हे व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र; करबुडे येथे वर्षावास प्रवचनमाला उत्साहात संपन्न

Gramin Varta
2 Min Read

‘कोकणकन्या’च्या सुपरफास्ट दर्जामुळे ‘मांडवी एक्सप्रेस’चे वेळापत्रक कोलमडले

Gramin Varta
2 Min Read

Innovations Redefining the Landscape of Transportation Technology

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वाशी तर्फे संगमेश्वर गावात लोकसहभागातून एकाच दिवशी १५ विजय बंधारे पूर्ण

1 Min Read
संगमेश्वर

परतीच्या पावसाचे दाभोळे परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन; उकाड्यापासून आराम पण शेतकरी चिंतेत

1 Min Read
संगमेश्वर

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

7 Min Read
संगमेश्वर

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात दाभोळे परिसरातील लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?