ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न
संगमेश्वर

आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 7:26 pm
Gramin Varta
17 Views
Share

देवरुख :- सृजन सायन्स सेंटर देवरुख येथे स्वागत थोरात सर यांची कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा बुधवारी संपन्न झाली. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त आठल्ये सप्प्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख मराठी विभागाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत एकूण १६८ विद्यार्थी व प्राध्यापक, प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. न्यू इंग्लिश स्कूल, ए.ए पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच दिव्यांग साहस प्रकल्प देवरुख चिपळूण येथील नॅब संस्था तसेच कोकणात दिव्यांगांसाठी काम करणारे कार्यकर्ते व प्रशिक्षक या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

स्वागत थोरात यांनी विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे २१ प्रकार व या अपंगत्वामुळे निर्माण होणारी आव्हाने, समस्या यांची जाणीव करून दिली व अशा प्रकारच्या अपंगत्वावावर मात करून स्वावलंबी कसे होऊ शकतो, दैनंदिन जीवनात आपल्या सगळ्या ज्ञानेन्द्रियांचा सक्षमतेने वापर करून आत्मविश्वासाने कसे जगायचे सांघिक भावना कशी जोपासावी नकारात्मकता दूर करून सकारात्मक कसे व्हावे याचा वस्तुपाठच विविध खेळांच्या माध्यमातूनथोरात यांच्या सहकारी स्वरूपा गोखले देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करून दिला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी ही कार्यशाळा. ‘मुलांमध्ये सजगता संवेदनशीलता निर्माण करेल, या मुलांमध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची जाणीव निर्माण होऊन ही मुले समाजाला उपकारक असेच कार्य करतील.’ असा विश्वास व्यक्त केला श्री स्वागत थोरात यांची ब्रेल मॅन ऑफ इंडिया अशी ओळख त्यांनी स्वतःच्या कार्याने सिद्ध केली आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी जागतिक रंगभूमीच्या इतिहासात अनेक उत्तमोत्तम नाटके बसवणे हे आव्हानात्मक काम त्यांनी केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग अंध विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी राज्यभरात प्रदर्शित करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘अपूर्व मेघदूत’, संगीत स्वयंवर’, महात्मा फुले यांचे दुर्लक्षित ‘तृतीय रत्न’ नाटक एवढेच नव्हे तर तमिळ लेखिका सलमा यांच्या सोनाली नवांगुळ यांनी मराठीत केलेल्या ‘मध्यरात्री नंतरचे तास’ या अनुवादातील काही प्रकरणांचे सादरीकरण यासाठी आवश्यक असणारी संकल्पना निर्मिती व दिग्दर्शन स्वतः थोरात सर यांनी केले आहे. अत्यंत तज्ञ अनुभवी अशा मार्गदर्शकांचे कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खूपच प्रेरक ठरले. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून याचा प्रत्यय येत होता.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेंद्र तेंडुलकर व उपप्राचार्य डॉ सरदार पाटील यांनीही या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. आवश्यक ते सहकार्य केले. मराठीच्या प्राध्यापक डॉ वर्षा फाटक व प्रा. अजित जाधव यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले. या कार्यशाळेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक डॉक्टर सुनील सोनवणे डॉक्टर प्रशांत नरगुडे, अनिकेत ढावरे, डॉ मयुरेश राणे, ग्रंथपाल डॉ सुभाष माइंगडे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक कोकणी सर, अरुंधती पाध्ये इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापक सोनाली नारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री शिरीष फाटक व सूजन सायन्स सेंटरचे चेअरमन डॉ. केदारी यांनी या कार्यशाळेसाठी सेंटरस मधील सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार ४० घरगुती बाप्पांना भावनिक निरोप

Gramin Varta
2 Min Read

दापोलीतील एक दिवसाच्या नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

7 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

2 Min Read
संगमेश्वर

दाभोळे महसूल सेवकाविरोधातील उपोषण स्थगित; चौकशीचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन

2 Min Read
संगमेश्वर

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?