ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ओला, उबरसह खाजगी टॅक्सींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; भाडे वाटपात पारदर्शकता आणण्यावर भर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ओला, उबरसह खाजगी टॅक्सींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; भाडे वाटपात पारदर्शकता आणण्यावर भर
महाराष्ट्र

ओला, उबरसह खाजगी टॅक्सींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; भाडे वाटपात पारदर्शकता आणण्यावर भर

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 11:04 am
Gramin Varta
3 Views
Share

मुंबई: राज्यातील ओला, उबरसारख्या अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांशी जोडलेल्या तसेच स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या टॅक्सी चालकांना व्यवसाय वाटपात समान संधी मिळावी आणि प्रवासी वाहतुकीत निकोप व न्याय्य स्पर्धेचे वातावरण तयार व्हावे, यासाठी सर्वंकष स्वतंत्र डिजिटल प्रणाली विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्र मोटार व्हेईकल अ‍ॅग्रीगेटर रुल्स, २०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या समुच्चय वाहन धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांपुढे नुकतेच सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीत राज्यातील हजारो स्थानिक स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करणे आणि मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या मक्तेदारीला लगाम लावून सर्वांना व्यवसाय वाटपात समान वाटा मिळवून देणे यावर सखोल चर्चा करण्यात आली.

विद्यमान व्यवस्थेमध्ये अ‍ॅप कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या भाडे वाटपाच्या अल्गोरिदमची कार्यपद्धती अत्यंत अस्पष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. मुंबई विमानतळासारख्या मोठ्या आणि नफ्याच्या ठिकाणांहून मिळणाऱ्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या केवळ एव्हरेस्ट फ्लीट्स, मूव्ह फ्लीट अथवा कॅर्रम फ्लीट यांसारख्या बलाढ्य फ्लीट ऑपरेटरच्या वाहनांना प्राधान्याने दिल्या जातात, तर स्वतंत्र चालकांना नगण्य फेऱ्यांवर समाधान मानावे लागते, असा आक्षेप सादरीकरणात नोंदवण्यात आला. तसेच किरकोळ त्रुटींसाठी स्वतंत्र चालकांचे आयडी अचानक बंद किंवा निलंबित केले जातात, तर मोठ्या ऑपरेटरना वेगळे निकष लावले जातात, ही विषमता मोडून काढत सर्व चालकांसाठी समान नियमावली आणि निष्पक्ष कार्यपद्धती लागू करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे भाडे वाटप, जिओ-फेन्सिंग, थेट लोकेशन ट्रॅकिंग आणि दरवाढीच्या (सर्ज प्रायसिंग) अल्गोरिदमचे स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण करणे शक्य होणार आहे. याशिवाय चालकांचे कामाचे तास, विमा संरक्षण, पीएफ आणि ईएसआय यांसारख्या सामाजिक सुरक्षेच्या लाभांवरही नियंत्रण ठेवले जाईल. केवळ खासगी कंपन्यांचे नियमन न करता भूमिपुत्र चालकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित व परवडणारी वाहतूक सेवा पुरवणे हाच या सुधारित धोरणाचा मूळ उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना: वाय. पी. पोवार नगरची २१ फुटी ‘बॅलेंसिंग’ गणेशमूर्ती कोसळली

Gramin Varta
2 Min Read

पाच वर्षांची हमी मग रस्ता दरवर्षी खड्ड्यात का? संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गाव विकास समितीचा संतप्त सवाल

Gramin Varta
1 Min Read

CJP च्या आंदोलनापूर्वी राजधानीला छावणीचे स्वरूप; रेल्वे, मेट्रोसह इंटरनेट सेवांवर निर्बंध, सीमांवर कडक नाकेबंदी

Gramin Varta
2 Min Read

नारायण राणे यांच्या खासदार निधीतून राजापूर तालुक्यात रस्त्यांसाठी ४० लाखांचा निधी मंजूर

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार – अपर मुख्य सचिव व्ही. राधा

4 Min Read
महाराष्ट्र

दिवेआगर समुद्रकिनारी ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहलीतील निष्काळजीपणाप्रकरणी अकॅडमीच्या पाच जणांवर गुन्हा

1 Min Read
महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

2 Min Read
महाराष्ट्र

प्रभादेवीत ‘केजी मार्गचा राजा’ विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली; ४ जण जखमी, २१ वर्षीय चालक ताब्यात

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?