ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: CJP च्या आंदोलनापूर्वी राजधानीला छावणीचे स्वरूप; रेल्वे, मेट्रोसह इंटरनेट सेवांवर निर्बंध, सीमांवर कडक नाकेबंदी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » CJP च्या आंदोलनापूर्वी राजधानीला छावणीचे स्वरूप; रेल्वे, मेट्रोसह इंटरनेट सेवांवर निर्बंध, सीमांवर कडक नाकेबंदी
देश-विदेश

CJP च्या आंदोलनापूर्वी राजधानीला छावणीचे स्वरूप; रेल्वे, मेट्रोसह इंटरनेट सेवांवर निर्बंध, सीमांवर कडक नाकेबंदी

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:58 am
Gramin Varta
26 Views
Share

नवी दिल्ली  : मतदार यादीतील एसआयआरचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर-मंतर येथे १० ऑक्टोबरला पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली असतानाही संभाव्य गर्दीच्या शक्यतेने केंद्र सरकार आणि पोलिसांनी संयुक्तपणे कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या आहेत. दिल्लीच्या सीमांवर अतिरिक्त सुरक्षा दले आणि बीएसएफचे जवान तैनात करण्यात आल्याने तसेच शहरात विविध निर्बंध लादल्यामुळे राजधानीतील वाहतूक व्यवस्था, रेल्वे व मेट्रो सेवा, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ३८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून जंतर-मंतर परिसरातील इंटरनेट सेवा शुक्रवार रात्री १० ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत तात्पुरती खंडित करण्यात आली आहे; तर मेट्रोच्या तब्बल ४५ स्थानकांचे दरवाजे ९ ऑक्टोबरच्या रात्री ९ ते १० ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवी दिल्ली, मध्य दिल्ली आणि सीमावर्ती भागांत २० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेला जंतर-मंतर परिसर, जनपथ, निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलीस मुख्यालय यांच्या सभोवतालचा सुमारे दीड किलोमीटरचा पट्टा अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तिथे एकट्या भागातच ६,५०० हून अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी दिल्ली परिसराची २० झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक झोनची जबाबदारी थेट आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात असून, परवानगी नसलेल्या या आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन लाऊडस्पीकरद्वारे सातत्याने केले जात आहे.

परवानगी नसताना निदर्शनांसाठी शहरात प्रवेश करणाऱ्या आंदोलकांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी १२ तात्पुरती डिटेन्शन सेंटर्स उभारली असून अनधिकृत जमाव जमवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सामुदायिक केंद्रे, मशिदी आणि रहिवासी कल्याण संघटनांच्या (RWA) माध्यमातून शांततेचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे चिल्ला आणि गाझीपूर सीमांवर दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश पोलीस आणि निमलष्करी दलांची कडेकोट नाकेबंदी करण्यात आली असून प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी सुरू आहे. रात्री ९ नंतर सीमाभागातील दक्षता अधिक वाढवण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणा घेणार आहेत.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुर : धोपेश्वर गुरववाडी येथे किरकोळ वादातून महिलेवर काठीने हल्ला

Gramin Varta
1 Min Read

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळाच्या संकटात एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर!

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीतील वंचित सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळात समावेश करा; आमदार भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजनेतून ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण; ७,३९५ कोटींची तरतूद

2 Min Read
देश-विदेश

इंटरनेटचा वापर मुलांचा मूलभूत हक्क; वयाच्या आधारावर निर्बंध घालता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

3 Min Read
देश-विदेश

नेपाळमध्ये ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; अख्खा डोंगर खचून नदीत कोसळला, २४ ठार, १४ बेपत्ता तर शेकडो घरे जमीनदोस्त

2 Min Read
देश-विदेश

सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय;निवडणूक आयोगाच्या उप आयुक्तपदी सनदी अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची नियुक्ती

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?