ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट
रत्नागिरी

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 3:17 pm
Gramin Varta
19 Views
Share

जाकादेवी /संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार सुनिल सुरेश जोशी यांच्या गणपती कारखान्याला व प्रसिद्ध   सिध्दीविनायक नर्सरीला जाकादेवी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने क्षेत्रभेट देऊन गणपती तयार करण्याच्या संदर्भात व नर्सरीमधील शेकडो वनस्पतींविषयी सविस्तर प्रक्रिया समजावून घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.

गणपती कारखाना संदर्भात माहिती घेताना गणपती मूर्तीसाठी माती पनवेल येथून आणली जाते. शाडूच्या मातीच्या आधारे गणपती तयार केले जातात .या कारखान्यात ५५० एवढ्या गणेश मूर्ती  साकारल्या आहेत. विशेष येथील मूर्तिकार हे गणेशमूर्ती साच्याशिवाय साकारतात. त्यांचे फार मोठे कौशल्य  पाहून विद्यार्थी भारावून गेले.या कारखान्यात एक फुटापासून ते साडेपाच फुटापर्यंत गणेश मूर्ती साकारण्याचे कौशल्य सुनिल जोशी करतात‌. या कारखान्यामुळे परिसरातील होतकरू कलाकारांना हंगामी रोजगार मिळतो. शिवाय गणपती काढताना सेवाभावी वृत्ती आणि मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असेही मूर्तिकार सुनील जोशी यांनी सांगितले.

सिध्दीविनायक नर्सरीला भेट

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भौगोलिक दृष्ट्या अभ्यासाच्या दृष्टीने जाकादेवी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सिद्धिविनायक  नर्सरी  जाकादेवी ( गोनबरे ) येथेही निसर्ग क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी  नर्सरी स्थापनेपासून ते आजतागायत नर्सरीचे मालक श्री. संतोष गोनबरे यांची यशस्वी वाटचाल या संदर्भात विद्यार्थ्यांनी माहिती संकलित केली.आपल्या भागातील आंबा, काजू, नारळ, चिकू , पेरु,रातांबी  विविध प्रकारची फुलझाडे इ. चे महत्त्व किती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे हे सांगून या नर्सरीमध्ये सुमारे १लाखापेक्षा अधिक झाडे असल्याचे नर्सरीचे मालक संतोष गोनबरे यांनी सांगितले. या नर्सरीतील रोपांना ऑनलाइनच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ,बेंगलोर येथील शेतकरी वर्गाकडून मोठी मागणी असते.विद्यार्थ्यांना स्थानिक नर्सरी तसेच गणपती कारखाना यांची अधिकृत माहिती मिळावी,या उद्देशाने हे उपक्रम राबवण्यात आले होता. आवडती कला व स्वयंरोजगार या दृष्टीने हा उपक्रम विद्यार्थ्यांना अधिक भावला.या उपक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक नितीन मोरे ,पर्यवेक्षक शाम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, वैभव खानोलकर,क्रीडा शिक्षक किशोर नलवडे, संतोष सनगरे ,हेमराज बहिरम,संदेश सोनवडकर, सौ.अस्मिता आयरे, या शिक्षकांचे उत्तम सहकार्य लाभले. या स्तुत्य उपक्रमांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी कौतुक केले.

Total Visitors :

5427501
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित

Gramin Varta
2 Min Read

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Gramin Varta
3 Min Read

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

एसटी प्रवासात आदलाबदल झालेली लाखोंच्या दागिन्यांची बॅग राजापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत हस्तगत

2 Min Read
रत्नागिरी

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?