ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण

सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 14, 2026 8:48 am
Gramin Varta
5 Views
Share

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे पुढील नायशी फाटा येथे एसटी बसने कारला व ट्रेलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातप्रकरणी एसटी बसचालकाविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कारमधील दहा वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली असून वाहनांचे नुकसान झाले आहे.

हा अपघात १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घडला. अजित तुकाराम सावंत (वय ५०, सध्या रा. कुर्ला, मुंबई; मूळ रा. नडगिवे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हे आपल्या वॅगनआर कार क्रमांक एमएच-०३-एडब्ल्यू-८४६३ मधून मुंबईहून नडगिवे येथे जात होते. सावर्डे पुढील नायशी फाटा येथे आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच-१४-एमएच-६४५० ने त्यांच्या कारला तसेच पुढील ट्रेलरला धडक दिली.

या अपघातात कारचे नुकसान झाले असून कारमध्ये प्रवास करणारी अजित सावंत यांची दहा वर्षीय मुलगी अव्दैता हिला किरकोळ दुखापत झाली. एसटी बसचालक समाधान आण्णा जायभाय (वय ४०, रा. जिजामाता कॉलनी, आजरा गल्ली क्र. ३, कोल्हापूर; मूळ रा. किणी जाफराबाद, जि. जालना) यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी अजित सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.२७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला, चालक सुखरूप बचावला

Gramin Varta
2 Min Read

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

Gramin Varta
2 Min Read

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन

1 Min Read
चिपळूण

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

7 Min Read
चिपळूण

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

1 Min Read
चिपळूण

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?