ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेचे घवघवीत यश; १९ वर्षांखालील मुलींचा संघ विभागीय स्तरावर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेचे घवघवीत यश; १९ वर्षांखालील मुलींचा संघ विभागीय स्तरावर
रत्नागिरी

जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेचे घवघवीत यश; १९ वर्षांखालील मुलींचा संघ विभागीय स्तरावर

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 7:54 pm
Gramin Varta
376 Views
Share

वैभव पवार/गणपतीपुळे : रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या मुलींच्या तीनही वयोगटांतील संघांनी सहभाग नोंदवून पदकांची कमाई केली. यामध्ये १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारत प्रथम क्रमांक पटकावला आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. याशिवाय १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी करत आपापल्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या १४ वर्षांखालील संघात स्वरा राजवाडकर, वेदा खामकर, आराध्य महाडिक, मनस्वी आवटी, श्री जोशी, भूमी पाष्टे, रिमा सुर्वे, शुभ्रा गोताड, तनिष्का खाडे, त्रिशा चौघुले, सारिया सय्यद व अक्षरा आढाव यांचा समावेश होता. १७ वर्षांखालील संघात अस्मी हळदणकर, गार्गी घनवटकर, निधी गडदे, अनन्या गद्रे, आझमीना सांगरे, मुग्धा घाडगे, काव्य वर्मा, देवर्षी कासार, अलीना मालदार, त्रिशा गुरव, अर्जया थोरात व वफा राजवाडकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. तसेच प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर झेप घेणाऱ्या १९ वर्षांखालील संघात रिद्धी पाटील, मानसी घाटगे, अमरीन शेख, वैशाली बेळगावकर, झिया संसारे, अनुष्का खारवटकर, भक्ती दुर्गवली, अदिती फोटफोडे, अक्षरा निकम, वैदेही दुर्गवळी, सारा सोलकर व अदिती आढाव यांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनिया सेठी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक रणजित जाधव, मिथिला मोरे, आदित्य पवार व रोहित यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व गुणवंत खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Total Visitors :

5470350
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गोवळकोट धक्का परिसरातील खेळाच्या मैदानाची आरोग्य सभापतींकडून पाहणी; नगरसेविका मिसबाह नाखुदा यांच्या मागणीनंतर तातडीने स्वच्छतेचा दिला शब्द

Gramin Varta
1 Min Read

दाभोळे परिसरात अखेर पावसाचे पुनरागमन; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांची चिंता कायम

Gramin Varta
1 Min Read

फ्लायदुबई विमान हल्ला: आरोपी सह-वैमानिक यूएईच्या ताब्यात; दहशतवादी अँगलने तपास सुरू

Gramin Varta
2 Min Read

राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरीतील तीन तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना ‘या’ सवलती लागू

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

2 Min Read
रत्नागिरी

लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन

2 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी एमआयडीसीत धान्याची गाडी रिकामी करताना चक्कर येऊन हमालाचा मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?