ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरीतील तीन तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना ‘या’ सवलती लागू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरीतील तीन तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना ‘या’ सवलती लागू
रत्नागिरी

राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरीतील तीन तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना ‘या’ सवलती लागू

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 12:05 pm
Gramin Varta
834 Views
Share

मुंबई/ विशेष प्रतिनिधी : चालू २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची झालेली मोठी तूट आणि प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ अंतर्गत ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करत मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार जून महिन्यापासून आजतागायत झालेल्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे बाधित झालेल्या या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पिकांचे पंचनामे सुरू करण्यात येणार असून, सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांचे फोटो आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस स्थगिती, तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांची कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे सक्त आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील रोजगार टिकवून ठेवण्यासाठी रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जातील. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तिथे टँकर्सची सोय करणे, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे, अन्नधान्याची टंचाई भासू न देणे आणि जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या भरपाईपोटी मिळणारी प्रत्यक्ष आर्थिक मदत विहित प्रक्रियेनंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच जाहीर केली जाईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitors :

5470350
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

PM-RAHAT योजना ठरणार अपघातग्रस्तांसाठी संजीवनी! उपचारांसाठी सरकार देणार दीड लाखांपर्यंत कॅशलेस मदत

Gramin Varta
3 Min Read

भारतात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत, सेवांची निवड ग्राहकांच्याच हाती; सरकारने स्पष्ट केली भूमिका

Gramin Varta
2 Min Read

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : ओझरेखुर्द येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या; परिसरात हळहळ

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत रॅम्प, स्विमिंग पूलच्या नळजोडण्या बंद होणार

1 Min Read
रत्नागिरी

जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश; दोन खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत २९ ऑक्टोबरला ‘शाश्वत पाणी परिषदे’चे आयोजन- राजू भाटलेकर

2 Min Read
रत्नागिरी

शासकीय तंत्रनिकेतन व ‘एकता’ असोसिएशनमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार; टू व्हिलर मेकॅनिक क्षेत्रातील कौशल्यविकासाला मिळणार नवी दिशा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?