ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश; दोन खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश; दोन खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
रत्नागिरी

जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश; दोन खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 4:09 pm
Gramin Varta
144 Views
Share

वैभव पवार /गणपतीपुळे: तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी विविध धावण्याच्या शर्यतींमध्ये पदकांची लयलूट केली असून, दोन खेळाडूंची थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत सहभाग नोंदवला होता. यामध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. मृगजा हळदणकर हिने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. तर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कु. अस्मी हळदणकर हिने कडवी झुंज देत तृतीय क्रमांक मिळवला.

तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. श्रवण केदारी याने १०० मीटर धावणे स्पर्धेत वेगवान धाव नोंदवत द्वितीय क्रमांक संपादन केला.

या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कु. मृगजा हळदणकर आणि कु. श्रवण केदारी या दोघांची आगामी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दुहेरी यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिया सेठी यांनी पदक विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक रणजित जाधव, मिथिला मोरे, आदित्य पवार आणि रोहित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींनी यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5468707
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही तिवरे-गंगेचीवाडी मोबाईल नेटवर्कपासून वंचित; गावात जिओ टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी

Gramin Varta
2 Min Read

गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर महास्वच्छता; विविध शासकीय यंत्रणा, बँका आणि विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
2 Min Read

कुवारबाव येथे भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय तरुण जखमी, चालक फरार

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ६ अनाथ बालकांना लाभले हक्काचे घर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते दत्तक विधानाला अंतिम मंजुरी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

महामार्ग प्राधिकरणाचा अनागोंदी कारभार! कागदावर ‘प्रोजेक्ट प्लॅन’, प्रत्यक्षात मात्र भलताच प्रकार

3 Min Read
रत्नागिरी

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; चार ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार, तिकीट दरात होणार कपात

3 Min Read
रत्नागिरी

अंगारकीनिमित्त गणपतीपुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय मदत कक्ष; भाविकांसाठी तातडीची सेवा उपलब्ध

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?