ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा
रत्नागिरी

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 11:38 am
Gramin Varta
180 Views
Share

रत्नागिरी : मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत ७ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, १८२ पुड्या आणि मोबाईल असा एकूण सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नर्ममोहम्मद दिलमोहम्मद खान ऊर्फ कल्लू (वय २५, रा. भाजी मार्केटसमोर, रत्नागिरी) आणि मस्तान मगदम शेख (वय २६, रा. आजगावकरवाडी, बाजार, रत्नागिरी) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.३५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार शासकीय वाहनाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत होते. माळनाका एसटी स्टँड, झारणी रोड आणि मच्छीमार्केट परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ व इतर साहित्य बाळगल्याचे आढळून आले.

कारवाईत ७ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, त्याच्या १८२ पुड्या, अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टिकची पिशवी तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपराज प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६२/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

2 Min Read
रत्नागिरी

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

1 Min Read
रत्नागिरी

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?