ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार
रत्नागिरी

रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 1:59 pm
Gramin Varta
264 Views
Share

रत्नागिरी : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या एस.टी. स्टँड ते भगवती बंदर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मांडवी भुते नाका चौकात एक धक्कादायक अपघात घडला आहे. पतीसोबत पायी रस्ता ओलांडत असलेल्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ॲक्टिव्हास्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी महिला गंभीर जखमी झाली असून, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाचणे येथील गोडावून स्टॉपजवळील गणराज रेसिडेन्सी (फ्लॅट नं. १०२, विनम्र नगर) येथे राहणाऱ्या सविता सुधीर चव्हाण (वय ५४, गृहिणी) या २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पती सुधीर चव्हाण यांच्यासह दुचाकीने (क्र. एम.एच. ०८ ए.डी. २३४६) मांडवी येथे गेल्या होत्या. तेथील रहाटघर पेट्रोल पंपावर त्यांनी आपली दुचाकी उभी केली आणि दोघेही पायी चालत जात होते. मांडवी भुते नाका येथील चौकात रस्ता ओलांडत असताना भगवती बंदराकडून रत्नागिरी एस.टी. स्टँडच्या दिशेने अतिशय वेगात आलेल्या एका ॲक्टिव्हासारख्या दिसणाऱ्या दुचाकी चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता हयगयीने व निष्काळजीपणाने वाहन चालवून सविता चव्हाण यांना थेट जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सविता चव्हाण या रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर जखमी सविता चव्हाण यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात ॲक्टिव्हा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मांडवी ते एस.टी. स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध रत्नागिरी शहर पोलीस घेत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

Gramin Varta
1 Min Read

हप्ता थकला तरी बळजबरीने वाहन जप्ती करता येणार नाही; फायनान्स कंपनीला १० लाखांच्या दंडासह वसुली नियमांवर कडक ताशेरे

Gramin Varta
3 Min Read

चिपळुण : सती येथे ड्युटीवरून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने केला काठी हल्ला

Gramin Varta
1 Min Read

सावर्डे विद्यालयात गणित पाढे पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

4 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा

2 Min Read
रत्नागिरी

सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा

2 Min Read
रत्नागिरी

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?