ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पाच वर्षांची हमी मग रस्ता दरवर्षी खड्ड्यात का? संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गाव विकास समितीचा संतप्त सवाल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पाच वर्षांची हमी मग रस्ता दरवर्षी खड्ड्यात का? संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गाव विकास समितीचा संतप्त सवाल
संगमेश्वर

पाच वर्षांची हमी मग रस्ता दरवर्षी खड्ड्यात का? संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गाव विकास समितीचा संतप्त सवाल

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 6:12 pm
Gramin Varta
83 Views
Share

देवरुख : देवरुख-संगमेश्वर-साखरपा
रस्त्याची २०२२ पासून पाच वर्षांची देखभाल आणि दुरुस्तीची हमी असतानाही, दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे. विशेष म्हणजे, यंदा पाऊस थांबल्यानंतरही काही मोजके खड्डे सिमेंट काँक्रीटने भरले जात असून, आजूबाजूचे इतर खड्डे मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याबाबत गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सार्वजिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुळात पावसाळा नसताना हे खड्डे शास्त्रीय पद्धतीने डांबराने भरणे गरजेचे असताना चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जर रस्त्याला पाच वर्षांची हमी मिळालेली आहे, तर मग या हमीचा नेमका उद्देश काय? असा संतप्त सवाल गाव विकास समितीकडून उपस्थित केला जात आहे.

या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत, विभागाचा कारभार ढासळल्याचा आरोप गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केला आहे. तसेच, गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनीही रस्त्याच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय, जिल्हाध्यक्ष शामकर्ण भोपळकर हे सातत्याने या गंभीर प्रश्नावर आवाज उठवत असून, रस्त्याच्या या दुर्दशेला नेमके जबाबदार कोण? असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना’ मोर्चाचा बदलला मार्ग; मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय

Gramin Varta
2 Min Read

दंतवैद्यकीय क्षेत्रात मिरजोळीच्या असीला दलवाईचे उज्ज्वल यश; गाझियाबाद येथून ‘एमडीएस’ पदव्युत्तर पदवी संपादन

Gramin Varta
2 Min Read

मातंग समाजाचा सीएसएमटी परिसरात ठिय्या; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

Gramin Varta
2 Min Read

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवळे येथे नसरे परिवाराची पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट; बांबू आणि गवतातून साकारले शेतकरी-निसर्गाचे अतूट नाते

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख: इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करणे पडले महागात; तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

2 Min Read
संगमेश्वर

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित सरदेसाई वाडा वाचवा; वैदेही सावंत यांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?