ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे सोनवडे येथे निवासी श्रमसंस्कार शिबिर; विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे सोनवडे येथे निवासी श्रमसंस्कार शिबिर; विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन
संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे सोनवडे येथे निवासी श्रमसंस्कार शिबिर; विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 12:52 pm
Gramin Varta
19 Views
Share

देवरूख: देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थानिक आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे शुक्रवार, १३ नोव्हेंबर ते गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या श्रमसंस्कार शिबिरादरम्यान सोनवडे गावामध्ये वनराई बंधाऱ्यांची निर्मिती, व्यापक ग्रामस्वच्छता, स्थानिक मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय तसेच शाळा परिसराची स्वच्छता आणि श्रमदान केले जाणार आहे. याशिवाय ग्राम सर्वेक्षण, महिला सबलीकरण विषयक मार्गदर्शन आणि आरोग्य जनजागृतीपर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सहजीवन, सामाजिक जाणीव आणि ग्रामीण संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिराचे औपचारिक उद्घाटन १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता सोनवडे गावच्या प्रशासक अमृता नरोटे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी दररोज दुपारच्या सत्रात तज्ज्ञांची व्याख्याने आणि कौशल्य विकास कार्यशाळांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सांगता सोहळा १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व संस्था प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. हे निवासी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे यांच्यासह महाविद्यालयाचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Total Visitors :

5469536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली: माटवण येथे म्हशी चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

शाळेत शिपाई असणाऱ्या वडिलांच्या घामाचे पांग मुलाने फेडले; चिपळूणच्या तळवडे गावातील शुभम कोकरे बनले डॉक्टर, आई-वडिलांच्या संघर्षाला यशाची सलामी

Gramin Varta
2 Min Read

लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन

Gramin Varta
2 Min Read

दुसऱ्याचे प्राण वाचवायला निघाले, पण काळाने वाटेतच गाठले! अंजनारीच्या दरीत खाकी वर्दीतील देवदूताचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

1 Min Read
संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

1 Min Read
संगमेश्वर

सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरुखच्यावतीने “वसुंधरा ऑलिंपियाड: २०२६”चे आयोजन

3 Min Read
संगमेश्वर

माध्यमिक विद्यालय दाभोळेच्या मुख्याध्यापिका चित्रा कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?